Close Visit Mhshetkari

ST Employees : मोठी बातमी… “या” कर्मचाऱ्यांना दसरा दिवळीच्या तोंडावर मिळाले DA वाढीचे गिफ्ट.. पहा किती वाढणार पगार

ST Employees : दिनांक ११ सप्टेंबर रोजी बुमेदत आमरण उपोषण व आंदोलनाची दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यावर प्रलंबीत मागण्या सोडवण्याची जबाबदारी देण्यात आली होती.राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना सुद्धा समांतर ४२ % महागाई भत्ता देण्याची मागणी राज्य एसटी कामगार संघंटनेने लावून धरली होती.

या कर्मचाऱ्यांना मिळाली महागाई भत्ता वाढ

राज्य सरकारने दसरा – दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांना मोठे गिफ्ट दिले. सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या महागाई भत्ताच्या समांतर डीए थकबाकी देण्याची मागणी एसटी महामंडळ कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून करण्यात आली होती.

उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या यशस्वी शिष्टाईने झालेल्या बैठकीत ३४ टक्क्यावरून ३८ % केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ४२ % महागाई भत्ता देण्याला मंजुरी दिली होती.आता बुधवारी सदरील घोषणेला अंतिम मान्यता मिळाली आहे. आता दि. ७ ऑक्टोंबर पासून एसटी कर्मचाऱ्यांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता वाढ वेतनात सामाविष्ट करण्यात येणार आहे.

हे पण वाचा ~  7th pay arrears : आनंदाची बातमी ... सरकारी कर्मचाऱ्यांचा सातवा वेतन आयोग थकित हप्ता मिळण्यासंदर्भात मार्ग मोकळा! निधी ..

प्रलंबित प्रश्नांसाठी सतितीची स्थापना

एसटी महामंडळाचे आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी त्री सदस्यीस समिती गठीतराज्य सरकारने अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली तिन सदस्यीय समितीची नियुक्ती केली आहे. समिती खालील मुद्यावर चर्चा करून अहवाल ६० दिवसात सरकारला सुपुर्द करणार आहे.

  • मुख्यमंत्र्यांच्या बैठकीतील निर्णयांची अंमलबजावणी
  • वर्ष २०१६-२०२० कामगार करारातील ४८४९ कोटीतील शिल्लक रकमेचे कामगारांना वाटप
  • संप कालावधीतील वेतनवाढीमूळे निर्माण झालेली विसंगती दुर करणे,
  • सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रलंबीत देणी देणे
  • एसटी कर्मचार्यांना ७ वा वेतन आयोग लागू करणे

महागाई भत्ता वाढ – पगारात होणारी वाढ डीए फरक येथे चेक करा

➡️➡️ DA calculator ⬅️⬅️

3 thoughts on “ST Employees : मोठी बातमी… “या” कर्मचाऱ्यांना दसरा दिवळीच्या तोंडावर मिळाले DA वाढीचे गिफ्ट.. पहा किती वाढणार पगार”

Leave a Comment