Amrit Vrishti Yojana : आजकाल प्रत्येक व्यक्ती भविष्यासाठी गुंतवणूक करतो.सुरक्षित आणि चांगल्या गुंतवणुकीचे अनेक पर्याय आहेत. जसे की, Post Office आणि LIC Scheme, Fixed Deposite इत्यादी.
आता State Bank of India ने अलीकडेच आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन Fixed Deposite Scheme अर्थात FD Scheme जाहीर केली आहे.अमृतवृष्टी फिक्स्ड डीपोझिट स्किम असे त्या एफडी योजनेचे नाव आहे. सदरील मुदत ठेव योजना 444 दिवसांनी मॅच्युअर होते.
Amrit Vrishti FD Yojana
अमृतवृष्टी एफडी योजनेमध्ये SBI ने आपल्या सर्वसामान्य ग्राहकांना 7.25 % व्याजदर देत आहे. SBI कडून चालवल्या जाणाऱ्या या योजनेमध्ये ज्येष्ठ नागरिकांना 7.75 % व्याजदर दिला जातो.
सदरील योजनेमध्ये ज्येष्ठ नागरिकांनी 5 लाख रुपये गुंतवल्यास मॅच्युरिटीनंतर ग्राहकाला 5 लाख 47 हजार 524 रुपये मिळतात. ज्येष्ठ नागरिकाला व्याजापोटी 47 हजार 524 रुपये मिळतील.
अमृतवृष्टी एफडी योजना
सध्या SBI सह इतर राष्ट्रीयीकृत बँका आणि खासगी बँकाही FD वर चांगले व्याजदर देत आहेत.अल्प आणि दीर्घ काळासाठी व्याजदर चांगले असतात.सदरील योजनात वेळोवळी अनेक सुधारणा होत असतात.
बँकांच्या बचत योजनेत त्यांच्या व्याजदरात बदल होत असतात.बँकांच्या अधिकृत वेबसाइटवर याविषयी लेटेस्ट माहिती उपलब्ध असते. व्याजाची खात्री करुन ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने FD करता येते.