8th Pay Commission : सातवा वेतन आयोगाचा कार्यकाळ संपत आला आहे. त्यामुळे आठवा वेतन आयोग केव्हा लागू होणार याकडे लाखो कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
8th Pay Commission update
मित्रांनो, आपल्याला माहीत आहे की,सातवा वेतन आयोग 1 जानेवारी 2016 पासून लागू झाला होता. प्रचलित नियमानुसार दर 10 वर्षांत नवीन वेतन आयोग येत असतो. परिणामी 31 डिसेंबर 2025 रोजी 7 व्या वेतन आयोगाचा कार्यकाल समाप्त होत आहे.
सरकारने ऑक्टोबर 2025 मध्ये आठव्या वेतन आयोगाचे टर्म्स ऑफ रेफरन्सला मंजूरी दिली आहे. यानंतर नोव्हेंबरमध्ये अधिसूचना जारी झाली होती. यामुळे हे स्पष्ट झाले की, नवीन वेतन आयोगाची प्रक्रीया सुरु झाली आहे.
8 व्या वेतन आयोगाला त्याचा अहवाल तयार करण्यासाठी 18 महिन्याची मुतत दिली आहे. दरम्यान आयोग महागाईचा दर आर्थिक स्थिती आणि कर्मचाऱ्यांची गरज याचे अध्ययन करणार आहे.
नवीन वेतन आयोगाला त्याचा अहवाल तयार करण्यासाठी 18 महिन्याचा वेळ दिला आहे. या दरम्यान आयोग महागाईचा दर आर्थिक स्थिती आणि कर्मचाऱ्यांची गरज याचे अध्ययन करणार आहे.
आतापर्यंतच्या वेतन आयोगाचा ट्रेंड पाहिला तर नवीन सॅलरी स्ट्रक्चर जुना वेतन आयोग संपताच प्रभावी होतो. त्यामुळे 1 जानेवारी 2026 ही संभाव्य तारीख असू शकतो.
अर्थ तज्ज्ञांच्या मते यावेळी पगारात 20-35 % वाढ होऊ शकते. मात्र सरकारने कोणताही अधिकृत आकडेवारी जाहीर केलेली नाही.
7th pay commission मध्ये फिटमेंट फॅक्टर 2.57 होता. बातमीनुसार यास वाढवून 3 किंवा त्याहून अधिक केले जाऊ शकते. त्यामुळे किमान वेतनात मोठी वाढ होणार आहे.
आठवा वेतन आयोग
आठवा वेतन आयोग केवळ कर्मचाऱ्यांपर्यंत मर्यादित नसून पेन्शनधारकांच्या पेन्शन आणि महागाई भत्ता देखील वाढ होणार आहे.ज्यामुळे निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांचे जीवनमान चांगले होण्याची आशा आहे. सध्या कर्मचारी संघटना आणि लाखो कर्मचारी नवीन वेतन आयोगाच्या घोषणेची वाट पहात आहेत.