EPFO Interest : भविष्य निर्वाह निधी संघटनेने आपल्या कर्मचार्यांना दिवाळी भेट दिली आहे. EPFO ने 2022-23 या आर्थिक वर्षातील EPFO Interest खात्यांमध्ये वर्ग करण्यास सुरुवात केली आहे.
ईपीएफओ कडून पीएफ व्याज ट्रान्सफर
भविष्य निर्वाह निधी संघटना चे व्याजदर दरवर्षी सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टी (CBT) आणि वित्त मंत्रालयाकडून ठरवले जातात. केंद्र सरकारने 2022-23 या आर्थिक वर्षासाठी जून 2023 मध्ये नविन व्याजदर जाहीर केले होते.
सरकारने व्याज दराचे पैसे pf खातेदारांच्या खात्यात वर्ग करण्यास सुरुवात केली आहे.आर्थिक वर्षात EPFO खातेधारकांच्या खात्यात जमा केलेल्या रकमेवर 8.15 % व्याज दर देत आहे.
भविष्य निर्वाह निधी संघटन अपडेट्स
EPFO धारकांच्या खात्यात व्याजाचे पैसे कधी जमा केले जाईल? याविषयी अनेक पीएफ खतेधारकांनी सोशल मीडियावर ईपीएफओकडे विचारणा केली होती. संघटनेने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X म्हणजेच ट्विटरवर पीएफ खात्यात व्याजाचे पैसे कधी ट्रान्सफर केले जातील यासंदर्भात माहिती दिलेली आहे.
सुकुमार दास नावाच्या युजरने EPFO कडे याबाबत प्रश्न विचारला होता. या प्रश्नाचे उत्तर देताना ईपीएफओनं, ईपीएफ खात्यात व्याजाची रक्कम ट्रान्सफर करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती दिली आहे. खातेधारकांना या वर्षी कोणतेही नुकसान न होता संपूर्ण व्याजाची रक्कम मिळेल, असे सांगत संघटनेने कर्मचाऱ्यांना संयम बाळगण्याची विनंती केलेली आहे.
How to check pf balance
जर तुम्ही पीएफ खातेधारक असाल आणि तुमच्या खात्यातील शिल्लक तपासायची असेल तर तुम्ही हे ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने सहज करू शकता. यासाठी तुम्ही मेसेज, मिस्ड कॉल याचा लाभ घेऊ शकता.
तुम्हाला तुमच्या EPFO नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून 7738299899 वर संदेश पाठवावा लागेल. याशिवाय तुम्ही 011-22901406 या क्रमांकावर मिस्ड कॉल पाठवूनही पीएफ खात्यातील शिल्लक रक्कम तपासू शकता.