Close Visit Mhshetkari

Extra increments : आता या कर्मचाऱ्यांना मिळणार आगाऊ वेतनवाढ! शाषन निर्णय निर्गमित

Extra Increments : दिनांक ३० जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या / होणाऱ्या कर्मचाऱ्यांना लगतच्या १ जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्तीवेतन निश्चित करण्याबाबत मार्गदर्शक सूचना यापूर्वी देण्यात आलेल्या आहेत.

आता खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी क्षेत्रिय कार्यालयांच्या निदर्शनास आणून दिली होती.

आता या कर्मचाऱ्यांना आगाऊ वेतनवाढ

वित्त विभागाच्या सूचनेनुसार खाजगी १००% अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचान्यांच्या बाबतीत लागू करण्यात येत आहे.शासन परित्रकान्वये दिनांक ३० जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या / होणान्या कर्मचान्यांना लगतच्या १ जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्तीवेतन निश्चित करण्याबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत.

सदर सूचना व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील व्यावसायिक अभ्यासक्रम राबविण्याऱ्या अशासकिय अनुदानित संस्थामधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी क्षेत्रिय कार्यालयांच्या निदर्शनास आणण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

हे पण वाचा ~  Employees leave : खुशखबर.. 'या' सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार 2 वर्षे पगारी सुट्टी! पहा सविस्तर

Employees increments update

वित्त विभागाच्या संदर्भाधीन पत्राअन्वये दिलेल्या सूचना राज्यातील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम, द्विलक्षी अभ्यासक्रम च पूर्व व्यावसायिक अभ्यासक्रम राबविणाऱ्या अशासकीय अनुदानित संस्थामधील शिक्षक/ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या बाबतीत लागू करण्यात येत आहे. सदर सूचनांचे तंतोतंत पालन करण्यात यावे.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेताक २०२३०९१११४४११८१३०३ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे

👉30 जुन सेवा निवृत्त कर्मचारी आगाऊ वेतनवाढ शासन निर्णय येथे पहा👈

Leave a Comment