7th pay commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाच्या आणि महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे.आजच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कर्मचाऱ्यांना मोठे गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे.
मित्रांनो आपल्याला माहिती असेल की खूप दिवसापासून कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढीचा प्रश्न ऐरणीवर आहे.त्यातच रामलीला मैदानावर सुरू असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे केंद्र सरकार बॅकफूटवर गेलेले दिसून येत आहे.त्यामुळे कर्मचाऱ्यांना खुश करण्यासारखी सरकार आज हा निर्णय घेऊ शकते.
DA Allowance hike
कोट्यवधी सरकारी कर्मचारी सणासुदीच्या आधी पगारवाढीच्या प्रतीक्षेत आहेत.केंद्र बुधवारी महागाई भत्त्यात (DA) वाढीची घोषणा करू शकते. ती जाहीर झाल्यास केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी नवरात्रपूर्व भेट ठरणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज महागाई भत्त्यात वाढ करण्यास मंजुरी मिळणे अपेक्षित आहे,असे डीएनएच्या अहवालात म्हटले आहे.केंद्रीय मंत्रिमंडळ आणि आर्थिक व्यवहार समितीची बुधवारी बैठक होत असून या बैठकीत केंद्र सरकार केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात वाढ करेल अशी अपेक्षा आहे.
केंद्राचा निर्णय महत्त्वाचा आहे कारण निवडणूक आयोग पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या तारखा कधीही जाहीर करू शकतो. निवडणूक आयोगाने तारखा जाहीर केल्यानंतर आचारसंहिता लागू होईल, त्यामुळे हा निर्णय घेणे सरकारसाठी आव्हानात्मक आहे.
डीए 3% ने वाढण्याची शक्यता
केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारक जुलै महिन्यापासून महागाई भत्त्यात वाढ होण्याची प्रतीक्षा करत आहेत.केंद्र 1 जुलैपासून लागू होणारा महागाई भत्ता 42 टक्क्यांवरून 45 टक्क्यांपर्यंत वाढवू शकतो.डीए वाढीनंतर ऑक्टोबरच्या पगारात जुलै ते सप्टेंबर या कालावधीतील महागाई भत्ता आणि थकबाकी समाविष्ट करणे अपेक्षित आहे.
15 ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सव सुरू होणार असून, 24 ऑक्टोबरला दसरा होणार आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय बुधवारी होण्याची शक्यता आहे.केंद्राच्या या डीए वाढीमुळे 47 लाख कर्मचारी आणि 68 लाख पेन्शनधारकांना फायदा होणार असून, त्यांना वाढत्या महागाईच्या ओझ्यातून दिलासा मिळणार आहे.
DA hike calculator
डीए वाढवण्याचा फॉर्म्युला औद्योगिक कामगारांसाठी (CPI-IW) नवीनतम ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित आहे.विशेष म्हणजे, डीए सरकारी कर्मचाऱ्यांना दिला जातो, तर डीआर पेन्शनधारकांना दिला जातो.
केंद्र सरकारच्या कर्मचार्यांना हे माहित असले पाहिजे की DA आणि DR वर्षातून जानेवारी आणि जुलै असा दोनदा वाढविला जातो.सध्या, एक कोटींहून अधिक केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 42 % महागाई भत्ता मिळत आहे.
मार्च 2023 मध्ये जेव्हा महागाई भत्ता वाढवण्यात आला तेव्हा तो 4 टक्क्यांनी वाढवून 42 % करण्यात आला. सध्याचा महागाईचा दर पाहता, या वेळी पुढील महागाई दरात 3 % वाढ अपेक्षित आहे.
खुशखबर… सरकारची मोठी घोषणा..या कर्मचाऱ्या महागाई भत्त्यत केली वाढ