Voter list : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती असेल की महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच जाहीर झालेला आहे. आता आपले मतदार यादीत नाव आहे का नाही शोधण्यासाठी नागरिकांची तारांबळ उडालेली आहे.
आज आपण आपले मतदार यादी मधील नाव कसे शोधायचे आणि आपल्या गावाची मतदार यादी कशी डाऊनलोड करायची या संदर्भात सविस्तर माहिती पाहणार आहोत.
How to download voter list
आपल्या गावाचे मतदार यादी त्याचबरोबर मतदान यादी मध्ये आपले नाव शोधण्यासाठी आपण खालील स्टेपनुसार कारवाई करावी.
मतदान यादी पाहण्यासाठी मतदार यादी voter list पाहण्यासाठी सगळ्यांत आधी तुम्ही Election Commission of Maharashtra असे टाईप करून सर्च करा.
त्यानंतर तुमच्यासमोर ceo.maharashtra.gov.in म्हणजे मुख्य निवडणूक अधिकारी यांचे पेज ओपन होईल.त्यानंतर Chief Electoral Officer,Maharashtra या पहिल्या लिंक वर क्लिक करा.
मतदार यादी पीडीएफ डाऊनलोड
- लिंक ओपन केल्यानंतर तुम्हाला Download Electoral Roll PDF या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
- यानंतर तुम्हाला प्रथम आपले राज्य निवडायचे आहे.
- राज्य निवडल्यानंतर आपल्याला नवीन https://ceo.maharashtra.gov.in/ या वेबसाईट वरती घेऊन जाईल.
- इथे आल्यानंतर Home या टॅब च्या सामोरं PDF Electoral Roll (Part wise) हा पर्याय पाहायला मिळेल.या वरती क्लिक करायचे आहे.
- सदरील वेबसाईटवरील Go to New Website या पर्यायावर क्लिक केलं की एक नवीन पेज ओपन होईल.
- या पेजवरील निवडणूक यादी (matdar yadi) विभागनिहाय PDF या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचे आहे.
Download Voter list
मतदान केंद्राच्या तपशीलात मतदान केंद्राचं नाव,क्रमांक आणि पत्ता दिलेला असतो आणि त्यानंतर मतदारांची संख्या (महिला,पुरुष,तृतीयपंथी) दिलेली असते.
आता या ठिकाणी गावातील मतदारांच्या नावाची यादी voter list दिलेली असेत.यात मतदाराचे नाव,पती किंवा वडिलांचं नाव,घर क्रमांक, वय, लिंग ही माहिती दिलेली असते.अशा पद्धतीने तुम्ही या यादीत तुमचे नाव शोधू शकता.
आपल्या गावाची मतदारयादी येथे डाऊनलोड करा
1 thought on “Voter list अशी डाऊनलोड करा आपल्या गावची मतदार यादी; मोबाईलवर 2 मिनिटात”