Close Visit Mhshetkari

Old pension संदर्भात केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत! मार्केट लिंक पेन्शन बदल्यात आता ..

Old Age Pension : लोकसभा निवडणूक आहे तशी तशी जुन्या पेन्शन योजनेची मागणी जोर धरू लागली आहे.देशातील पाच राज्यांमध्ये लवकरच विधानसभा निवडणूक होणार असल्याने टेन्शनचा मुद्द्याला आणखीनच खतपाणी मिळत आहे.

Old age pension calculator

आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये जुनी पेन्शन योजना त्याचबरोबर जातनिहाय जनगणना या दोन मुद्द्यांना अतिशय महत्त्व प्राप्त झालेले असून,मोदी सरकार कडून पुन्हा एकदा जुनी पेन्शन योजना लागू न करता त्यामध्ये सुधारणा करण्याच्या तयारीत असल्याची खात्रीलायक माहिती समोर आलेली आहे.

विरोधी पक्ष विशेषतः काँग्रेस आणि आम आदमी पक्ष या मुद्द्यावरून सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहेत.दरम्यान OPS विरुद्ध NPS वाद सुरू असताना भारत सरकारच्या अधिकाऱ्यांनी आता दिलासादायक बातमी दिली आहे.

हे पण वाचा ~  Family pension : खुशखबर... या सरकारी कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शनसह कुटुंब निवृत्ती वेतन, ग्रॅच्युइटी मिळणार! शासन निर्णय निर्गमित

NPS मध्ये सुधारणा करून कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या पगाराच्या 40 – 45% किमान पेन्शन मात्र, सरकार जुनी पेन्शन योजना परत करणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Old Age Pension Scheme

Financial Express ने अधिकाऱ्यांच्या हवाल्याने रॉयटर्सच्या वृत्तातून ही माहिती मिळाली आहे.पंजाब,राजस्थान, झारखंड आणि छत्तीसगडमध्ये गेल्या वर्षी जुनी पेन्शन योजना लागू केली आहे.नवीन ‘मार्केट लिंक पेन्शन स्कीम’ मध्ये बदल करण्याचा विचार सुरू आहे.

जुनी पेन्शन योजना मोदी सरकार का लागू करत नाही? जुनी पेन्शन योजना लागू न करण्याबाबत केंद्र सरकारचा युक्तिवाद असा आहे की, जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू केल्यास सरकारवरील आर्थिक बोजा मोठ्या प्रमाणात वाढेल.

This article written by Swati Ghuge form Maharashtra.She is famous Youtuber, website developer and Editor of MahEmployees.com

1 thought on “Old pension संदर्भात केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत! मार्केट लिंक पेन्शन बदल्यात आता ..”

  1. Fake news hai ye kyunki pahale bhi clear Kiya Gaya hai ki 40 to 45 percentage ka kuchh bhi vicharadhin nhi hai

    Reply

Leave a Comment