Gram Panchayat Elections : महाराष्ट्र राज्यातील बहुचर्चित ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झालेले असून अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या ग्रामपंचायतीच्या धुराळा आता उडणार आहे.
ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर
महाराष्ट्र राज्यातील सुमारे २,३५९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि २ हजार ९५० सदस्यपदाच्या; तर १३० सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठी ५ नोव्हेंबर २०२३ रोजी मतदान होणार आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस.मदान यांनी आज केली.
ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. ग्रामपंचायत सदस्य व सरपंच नामनिर्देशनपत्रे १६ ते २० ऑक्टोबर २०२३ या कालावधीत दाखल करता येणार आहे.नामनिर्देशनपत्रांची छाननी २३ ऑक्टोबर रोजी केली जाईल.
दाखल अर्जांची छाननी २३ ऑक्टोबर रोजी तर नामनिर्देशनपत्रे २५ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत मागे घेता येतील. याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात येईल.
ग्रामपंचायत निवडणूक निकाल
दि.५ नोव्हेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. मात्र गडचिरोली व गोंदिया या नक्षलग्रस्त भागात सकाळी ७.३० ते दुपारी ३ वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल. तेथे ७ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होईल.
आपल्या गावाची मतदार यादी येथे डाऊनलोड करा, पहा आपले नाव