Public holidays : नमस्कार मित्रांनो सगळ्यांनाच नवीन वर्षाची चाहूल लागलेली असताना आता 2024 मध्ये शैक्षणिक संस्था महाविद्यालय आणि विद्यापीठांना 31 सुट्ट्या मिळणार असून रविवारची साप्ताहिक सुट्टी या सुट्ट्या पकडण्यात आलेले आहे. महत्त्वाचं म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महावीर जन्मकल्याणक, भाऊबीजेच्या सुट्या रविवारी आल्या आहेत.
सार्वजनिक सुट्ट्यांचे परिपत्रक जाहीर!
मित्रांनो आपल्याला माहिती असेल की शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना रविवारची एक दिवसाची साप्ताहिक सुट्टी मिळत असते परंतु त्याचबरोबर काही सार्वजनिक शासकीय सुट्ट्या सुद्धा जाहीर केला जातात या दिवशी संबंधित कार्यालयाचे किंवा महाविद्यालयाचे कामकाज बंद करण्यात येत असते.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कार्यालयाला रविवार बरोबरच महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या शनिवारी सुद्धा सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे त्यामुळे या दिवशी विद्यापीठाचे कामकाज बंद राहणार आहे.
याशिवाय महाविद्यालयांना उन्हाळ्या सुट्ट्या बरोबर दिवाळीच्या सुट्ट्या सुद्धा असतात त्यामुळे यावर्षी सर्वाधिक सुट्ट्यांचा आनंद घेणं घेता येणार आहे त्या संदर्भात नुकताच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने 2024 च्या सार्वजनिक सुट्ट्यांचे परिपत्रक जाहीर केले आहे.
स्थानिक सुट्ट्या लागू
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची सलग्न महाविद्यालयांना संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी वेळोवेळी जाहीर केलेल्या सुट्ट्या सुद्धा लागू होतील. तसेच महाविद्यालया किंवा संस्थेला जाहीर सुट्ट्यांपैकी काही सुट्ट्या देता येणे शक्य नसल्यास त्या बदल्यात सोयीनुसार पर्यायी सुटी देता येणार आहे.
१३ सुट्या जोडून
साप्ताहिक रविवारच्या सुट्टीला जोडून म्हणजे सोमवार, शनिवार किंवा शुक्रवारी सुट्टी आल्यास ‘दीर्घ सुट्टी’ निमित्त फिरायला जाण्याचे नियोजन केले जाते. यावर्षी तब्बल १३ सुट्या अशा येणार असल्याने विद्यार्थ्यांसह प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे. या १३ पैकी चार सोमवारी, तीन शनिवारी आणि सहा शुक्रवारी आल्या आहेत.