Travel Allowance : महाराष्ट्र संवर्गात कार्यरत असलेल्या अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना अ. भा. से.(प्रवास भत्ता) नियम, १९५४ नुसार प्रवास भत्ता अनुज्ञेय आहे.
अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या प्रवास भत्त्यांचे नियमन राज्य शासनाच्या योग्य त्या नियमान्वये करण्यात येईल असे विहित करण्यात आले आहे.
विमान प्रवास भत्ता तरतूद
सामान्य प्रशासन विभागाच्या दि. २६/११/२०१२ च्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र संवर्गात कार्यरत अखिल भारतीय सेवेतील (भाप्रसे / भापोसे/भावसे) अधिकाऱ्यांना वित्त विभागाच्या शासन निर्णयांनुसार प्रवास भत्ता मंजूर व अदा करण्यात येतो.
शासन निर्णयामध्ये सचिवांपेक्षा कनिष्ठ दर्जाच्या अधिका-यांना न्यायालयीन व विधिमंडळाशी संबंधित कामकाजाव्यतिरीक्त अन्य अत्यावश्यक शासकीय कामकाजासाठी अन्य कोणत्याही मार्गाने साधनाने वेळेत पोहोचणे शक्य नसल्यास संबंधित विभागाच्या सचिवांच्या पूर्व परवानगीने विमान प्रवास करता येईल अशी तरतूद करण्यात आली आहे.
महाराष्ट्र संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना शासकीय/ न्यायालयीन कामानिमित्त विमान प्रवासाव्यतिरिक्त इतर मार्गाने प्रवास करावा लागतो.
Tranfer – Travel Allowance
अधिकारी व कर्मचाऱ्यांना तात्काळ आरक्षण मिळविण्यात येणा-या अडचणी,तातडीच्या कामासंदर्भात संबंधीत ठिकाणी उपस्थित होण्यास होणारा उशीर व वेळेचा अपव्यय टाळण्याकरीता केंद्रशासनाकडील अ. भा. से.अधिकाऱ्यांप्रमाणेच प्रवास भत्ता, बदली प्रवास भत्ता व विमान प्रवास बाबतच्या सवलती अनुज्ञेय करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
महाराष्ट्र संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना (भाप्रसे / भापोसे/ भावसे) प्रवास भत्ता व विमान प्रवास सवलती यासंदर्भात शासन निर्णयांमध्ये स्वयंस्पष्ट तरतुदी नुसार प्रस्ताव सचिव (वने) यांच्या पूर्वमंजुरीसाठी सादर न करता, वित्त विभागाच्या संदर्भाधीन शासन निर्णय दिनांक २६/०४/२०२२ मधील अनुज्ञेय तरतुदींनुसार कार्यवाही येईल असे म्हटले आहे.
विमान प्रवास भत्ता लाभार्थी अधिकारी/कर्मचारी,देय रक्कम व शासन निर्णय येथे पहा 👉 प्रवास भत्ता