Board exam time table : दहावी – बारावी बोर्ड परीक्षेचे वेळापत्रक वेबसाईटवर दिले आहे.बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी 2024 पासून सुरू होत आहे ते 19 मार्च 2024 पर्यंत ही परीक्षा पार पडणार आहे.
इयत्ता दहावीची बोर्डाची परीक्षा 1 मार्च 2024 पासून सुरू होईल ते 22 मार्च 2024 पर्यंत सुरू राहील.खालील स्टेप्स प्रमाणे आपण हे वेळापत्रक डाऊनलोड करू शकता.
दहावी बारावी परीक्षा वेळापत्रक
बोर्ड परिक्षा संदर्भात एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यावी की, हे संभाव्य वेळापत्रक उपलब्ध करून देण्यात आले आहे.सदरील वेळापत्रकाच्या PDF मध्ये देखील खाली अशी टीप देण्यात आली आहे.
सदरचे वेळापत्रक संभाव्य असून परीक्षेपूर्वी उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालय कडे देण्यात येणाऱ्या छापील वेळापत्रक अंतिम असणार आहे. सदरील वेळापत्रकावरून खात्री करून विद्यार्थ्यांनी परीक्षेस प्रविष्ट व्हावे.
दहावी बारावी परीक्षा 2024 तोंडी, प्रात्यक्षिक, श्रेणी आणि अन्य विषयांचे परीक्षा वेळापत्रक स्वतंत्र्यपणे मंडळामार्फत शाळा,कनिष्ठ महाविद्यालयांना कळविण्यात येणार आहे.
बोर्ड वेळापत्रका संदर्भात काही सूचना, हरकती असल्यास त्या विभागीय मंडळाकडे, तसेच राज्य मंडळाकडे १५ दिवसाच्या आत लेखी स्वरूपात करण्याची सूचना देण्यात आली आहे.
10th 12th Board exam timetable
सर्वप्रथम आपणास महाराष्ट्र बोर्डाच्या mahahsscboard या वेबसाईटला भेट द्यावी लागेल.
- बोर्डाच्या होमपेजवर लेटेस्ट नोटिफिकेशन या टॅब वर, तुम्हाला दहावी आणि बारावी 2024 साठीचे नवीन वेळापत्रक दिसेल.
- आता दहावी आणि बारावीचे वेळापत्रकाची लिंक दिसेल त्यावर क्लिक करावे.
- नवीन विंडोमध्ये पीडीएफ स्वरूपामध्ये वेळापत्रक उघडले जाईल.
- या ठिकाणावरून आपण वेळापत्रक डाऊनलोड करू शकता.
दहावी बारावी परीक्षा वेळापत्रक येथे डाऊनलोड करा 👉 Board Exam Timetable