Travel Allowance : केंद्र शासनाने सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींच्या अनुषंगाने दि.०७ जुलै २०१७ व दि. ०२ ऑगस्ट २०१७ रोजीच्या आदेशान्वये कर्मचाऱ्याच्या निवासस्थानापासून कर्तव्य स्थानापर्यंतच्या प्रवासावरील खर्चाची भरपाई म्हणून सुधारीत दराने वाहतूक भत्ता मंजूर करण्यात येतो.
Travel allowance new rule
महाराष्ट्र नागरी सेवा नियम, २०१९ नुसार शासकीय कर्मचाऱ्यांना दि.०१ जानेवारी,२०१६ पासून सुधारित वेतन संरचना लागू करण्यात आली आहे. यानुसार महाराष्ट्र राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांना मंजूर केलेल्या वाहतूक भत्याच्या दरांत सुधारणा करण्यात आली आहे.
प्रवास भत्ता नियम
कर्तव्य स्थानापासून एक किलोमीटर अंतराच्या आत किंवा कर्तव्यस्थान आणि निवासस्थान यांच्या एकत्र परिसरात शासकीय निवासस्थान पुरविण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना हा भत्ता अनुज्ञेय असणार नाही.
ज्या कर्मचाऱ्यांना शासकीय वाहतूक सुविधा पुरविण्यात आली आहे, त्यांना हा भत्ता अनुज्ञेय असणार नाही.
तसेच वाहतूक भत्त्याचे प्रदान करण्यासंदर्भात इतर विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती आहे त्याचप्रकारे यापुढे लागू राहील.
रजा प्रशिक्षण दौरा इत्यादी कारणामुळे संपूर्ण कॅलेंडर महिन्यात अनुपस्थित असल्यास त्या महिन्यात हा भत्ता अनुज्ञेय असणार नाही.
प्रवास भत्ता लाभार्थी कर्मचारी
- सर्व अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्थांच्या प्राथमिक, माध्यमिक शाळांतील पूर्णकालीक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी
- कृषि व कृषितर विद्यापीठांमधील व तत्संलग्न महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना सदरहू आदेश लागू होणार आहे.
- जिल्हा परिषदांच्या पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना हे आदेश योग्य त्या फेरफारासह लागू करण्यात यावेत.
- विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वेतनमानानुसार वेतन घेणाऱ्या शिक्षक कर्मचाऱ्यांनाही हे आदेश लागू करण्यात यावेत.
नवीन प्रवास भत्ता वाढ येथे पहा 👉 Travel Allowance