Close Visit Mhshetkari

Medical Insurance : ‘ या ‘ शासकिय कर्मचाऱ्यांच्या वैद्यकिय तपासणी संदर्भात नवीन नियमावली ! शासन निर्णय निर्गमित ..

Medical Insurance : अखिल भारतीय सेवा नियम, २००७ मधील नियम ३ व त्यासोबतचा नमुना ४ अनुसार, दि. ३१.०३.२०२३ रोजी ४० वर्षे किंवा अधिक वय असलेल्या राज्यातील भारतीय वन सेवेतील अधिकाऱ्यांनी, त्यांची विहित वैद्यकीय तपासणी महसूल विभागनिहाय निश्चित केलेल्या खाजगी रुग्णालयातून करुन घेण्यासंदर्भात शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे.

Medical Checkup Insurance

महाराष्ट्र राज्य संवर्गातील दि.३१.३.२०२३ रोजी ४० वर्षे किंवा अधिक वय असलेल्या भारतीय वन सेवेतील अधिकाऱ्यांनी ते कार्यरत असलेल्या महसूली विभागातील खाली दर्शविलेल्या खाजगी रुग्णालयातून / वैद्यकीय संस्थामधून व नमूद केलेल्या सर्व वैद्यकीय तपासण्या चालू वर्षी (सन २०२३-२४) करुन घ्याव्या लागणार आहेत.

अमरावती महसूल विभागात कार्यरत असलेल्या भावसे अधिकाऱ्यांनी त्यांना जवळ असणाऱ्या इतर महसूली विभागासाठी निश्चित केलेल्या खाजगी रुग्णालयांतून सदर वैद्यकीय तपासणी करुन घ्यावी.

सर्व वैद्यकीय तपासण्या करण्याची सुविधा उपलब्ध असलेल्या संबंधित जिल्हयातील शासकीय रुग्णालये अथवा महसूली विभागातील शासकीय/ महानगरपालिका रुग्णालयांमध्ये देखील वैद्यकीय तपासणी करुन घेता येईल.

वैद्यकीय तपासणी सर्वसाधारण सूचना

१) भारतीय वन सेवेतील अधिकाऱ्यांनी त्या-त्या महसूली विभागासाठी नेमलेल्या रुग्णालयांतून अथवा शासकीय किंवा महानगरपालिका रुग्णालयांमधून प्रपन्त्र-ब मध्ये दर्शविलेल्या सर्व वैद्यकीय तपासण्या करुन घेतल्यानंतर सदर रुग्णालयाला वैद्यकीय चाचण्यांसाठी आवश्यक असलेली रक्कम प्रथम स्वतः अदा करावी लागणार आहे.

२) सदरील प्रतिपूर्ती आपल्या कार्यालयातून मिळवावी, ज्या भारतीय वन सेवेतील अधिकाऱ्यांना प्रपत्र-अ मधील महसूल विभागनिहाय निश्चित केलेल्या किमान दरापेक्षा जास्त दर असणाऱ्या रुग्णालयांमधून वैद्यकीय तपासणी करावयाची असल्यास महसूल विभागनिहाय किमान दरापेक्षा अतिरिक्त असणारा खर्च संबंधित अधिकाऱ्याने स्वखर्चाने करावयाचा आहे. निश्चित किमान दरापेक्षा अतिरिक्त खर्चाची प्रतिपूर्ती शासनाकडून दिली जाणार नाही, याची नोंद घेण्यात यावी.

हे पण वाचा ~  Employees Medical bill : खुशखबर... सरकारी कर्मचाऱ्यांच्या मेडिकल बिल संदर्भात नवीन शासन परिपत्रक निर्गमित! आता होणार ऑनलाइन ...

३) शासन निर्णयान्वये वार्षिक वैद्यकीय तपासणीच्या खर्चाची प्रतिपूर्ती घेणाऱ्या अधिकाऱ्यांना दि.३१ ऑगस्ट, २००६ अन्वये दर दोन वर्षातून एकदा अनुज्ञेय असलेली वैद्यकीय तपासण्यांवरील खर्चाची प्रतिपूर्ती देय राहणार नाही.

३) वैद्यकीय तपासण्यांचा १ दिवस हा कालावधी कर्तव्य कालावधी म्हणून समजण्यात येईल. सदर तपासण्या शासकीय सुट्टीच्या दिवशी केल्यास त्यासाठी कोणतीही रजा/बदली रजा अनुज्ञेय असणार नाही.

४) वैद्यकीय तपासणीचा कालावधी हा कर्तव्य कालावधी समजल्यामुळे भारतीय वन सेवेतील अधिकारी अन्यथा दौऱ्यावर असतांना, त्यांना ज्या दराने प्रवासभत्ता / दैनंदिन भत्ता दिला जातो. त्या दराने तो (लागू असल्यास) देय राहील. असा प्रवास भत्ता/दैनिक भत्ता यांचे दर वित्त विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार, देय राहतील. याबाबतची परिगणना संबंधित अधिकाऱ्यांना वेतन प्रदान करणाऱ्या कार्यालयाने करुन त्याचे प्रदान करावे.

५) वैद्यकीय तपासणीस जाण्यापूर्वी अधिकाऱ्यांनी, त्यांच्या लगतच्या वरिष्ठ अधिकाऱ्यास ते वैद्यकीय तपासणीसाठी मुख्यालयात अथवा मुख्यालयाबाहेरील रुग्णालयात जाणार असल्याबाबची पूर्वकल्पना द्यावी.

६) वैद्यकीय तपासणीसाठी होणारा खर्च, संबंधित अधिकाऱ्याच्या आस्थापनेवरील वेतन व भत्यांसाठी लागू असलेल्या लेखाशिर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा व तो त्या-त्या वर्षासाठीच्या मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा.मात्र यासाठी आर्थिक वर्षाचे बंधन राहणार नाही.

७) भारतीय वन सेवेतील अधिकारी कार्यरत असणाऱ्या महसूल विभागाशिवाय अन्य महसूल विभागातील रुग्णालयात वैद्यकीय तपासण्या करु इच्छित असल्यास, त्यांना इच्छित महसूल विभागातील प्राधिकृत केलेल्या रुग्णालयात अनुज्ञेय केलेल्या दरानुसार वैद्यकीय तपासण्या करुन घेण्यास परवानगी देण्यात येत आहे.

This article written by Swati Ghuge form Maharashtra.She is famous Youtuber, website developer and Editor of MahEmployees.com

Leave a Comment