Extra increment : खुशखबर … ‘या’ सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार आगाऊ वेतनवाढ! शासन निर्णय निर्गमित

Extra increments : वित्त विभागाच्या उपरोक्त शासन परिपत्रकान्वये दिनांक ३० जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या / होणाऱ्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना लगतच्या १ जुलै ची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्तीवेतन निश्चित करण्याबाबत मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत.

‘यांना’ मिळणार आगाऊ वेतनवाढ !

सदर सूचना उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या नियंत्रणाखालील अनुदानित शैक्षणिक संस्थांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती,त्यासंदर्भात खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे.

वित्त विभागाच्या दिनांक २८ जून, २०२३ च्या संदर्भीय परिपत्रकान्वये देण्यात आलेल्या सूचना अकृषि विद्यापीठे,अनुदानित महाविद्यालये, अनुदानित अभिमत विद्यापीठे, अनुदानित समूह विद्यापीठे व त्यांची घटक महाविद्यालये, अनुदानित तंत्र शिक्षण महाविद्यालये/ संस्था, डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्र शिक्षण विद्यापीठ-लोणेरे, सी.ओ. ई.पी. तंत्रज्ञान विद्यापीठ, अनुदानित कला संस्था, आय.सी.टी. विद्यापीठ, एल. आय.टी. अभिनव तंत्रज्ञान विद्यापीठ यामधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू करण्यात आली आहे.

हे पण वाचा ~  Diwali Bonus : आनंदवार्ता! केंद्रीय कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर, पण कोणत्या गटातील कर्मचाऱ्यांना किती पैसे मिळणार?

सदर शासन परिपत्रक वित्त विभागाचा अनौपचारिक संदर्भ क्रमांक ४३०/२३/सेवा-3 दिनांक ९ नोव्हेंबर, २०२३ अन्वये प्राप्त मान्यतेनुसार निर्गमित करण्यात आला आहे.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेतांक २०२३१११७१४५९३४२१०८ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने सांक्षाकित करुन काढण्यात येत आहे.

Leave a Comment