Close Visit Mhshetkari

Rs 2000 note ban : नोट बदलायची मर्यादा ओलांडल्यास आधार आणि पॅन द्यावा लागेल? पहा नोटा बदलण्याचे नियम माहिती आहे का? ‘या’ नोटा होणार जप्त!

Rs Rs 2000 Note News : आरबीआयने 2 हजाराच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला आहे.नोटबंदीच्या या निर्णयाने अनेकांना आश्चर्य वाटत आहे.दोन हजाराच्या नोटा बादच करायच्या होत्या तर त्या चलनात आणल्याच कशाला? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे.

2 हजार रुपयांची नोट बंद का ?

देशातील चलन व्यवस्थापन अतिशय चोखपणे काम बजावत असल्याची बाब आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी मांडली. त्यामुळे अनेकांनीच आपल्याकडे असणाऱ्या 2 हजार रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी विविध बँकांकडे धाव घेतल्याचे पाहायला मिळत आहे.आरबीआयने दोन हजाराच्या नोटेला क्लिन नोट पॉलिसी अंतर्गत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

2000 च्या नोटा बदलण्याबाबत नियम

  • 23 मे पासून 2 हजार रुपयांची नोट बदलता येईल किंवा कोणत्याही बँकेत जमा करता येईल.
  • 30 सप्टेंबर 2023 पर्यंत कोणत्याही बँकेच्या शाखेत 2000 रुपयांच्या नोटा बदलता येतील.
  • 20 हजार रुपयांपर्यंत रक्कम एका वेळी बदलले किंवा बँकेत जमा केले जाऊ शकते.
  • आरबीआयच्या 19 शाखांमध्येही नोटा बदलता येणार आहे.
  • थोडक्यात RBI आणि इतर सर्व बँकांमध्ये नोटा बदलल्या जाऊ शकतात.
    एकूण रक्कम एकावेळी 20,000 रुपयांपेक्षा जास्त असू शकत नाही.
हे पण वाचा ~  Money Earning Apps : मस्तच! घरबसल्या करू शकता कमाई, ‘हे’ 10 Mobile Apps येतील उपयोगी! पहा यादी ... 

बँकेची मार्गदर्शक तत्त्वे काय आहेत?

  • नोटा बदलून घेण्यासाठी लोकांना कोणताही फॉर्म भरावा लागणार नाही.
  • नोट बदलण्यासाठी बँक कोणतेही शुल्क आकारणार नाही.
  • लोकांना कोणताही ओळखपत्र दाखवण्याची गरज नाही.
  • भारतातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने देखील नोटा बदलण्याबाबत एक परिपत्रक जारी केले आहे.
आधार कार्ड पॅनकार्ड केव्हा आवश्यक

जर तुम्ही 50 हजारांपेक्षा जास्त रोख जमा करत असाल तर तुम्हाला पॅन कार्ड आणि आधार कार्ड दाखवावे लागेल. आरबीआयच्या नियमांनुसार, तुम्ही एका दिवसात फक्त 50,000 रुपये जमा करू शकता. एका वर्षात फक्त 20 लाख रुपयांपर्यंतच ठेवी करता येतात. यापेक्षा जास्त रोख रक्कम जमा केल्यास तुम्हाला पॅन क्रमांक द्यावा लागेल.

50 हजारांपेक्षा जास्त रोख जमा केल्यास बँक त्याची माहिती आयकर विभागाला देते,यानंतर, प्राप्तिकर विभाग या प्रकरणाची माहिती घेते आणि चुकीचे असल्यास कारवाई देखील करते.

सावधान .. ‘या’ नोटा होणार बॅंकेत जप्त

Bank note news

Leave a Comment