Close Visit Mhshetkari

State employees : शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन होणार वेळेवर! शासन परिपत्रक निर्गमित

State employees : जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांचे वेतन दोन-दोन महिने विलंबाने होत असलेबाबत रा.प्र. भोईर उप सचिव (वित्त) तथा सहसंचालक, महाराष्ट्र शासन यांच्याकडून मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व) यांना परिपत्राद्वारे उपाययोजना करण्यासंदर्भात सुचविले आहे.

शासकीय कर्मचारी वेतन अपडेट्स

सरकारी कर्मचाऱ्यांचे मासिक वेतन सातत्याने विलंबाने होत असल्याचे निदर्शनास आले आहे. जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या वेतनावर अनेक बाबी अवलंबून असतात.जसे की, गृहकर्ज, मुलांच्या शालेय शिक्षण तसेच उच्च शिक्षणासाठी बाहेरगावी असणाऱ्या पाल्यांना वेळीच पैसे पाठवता न येणे,घरभाडे वेळेत देता न येणे, स्वतः च्या तसेच कुटूंबाच्या औषधोपचारासाठी येणारी आर्थिक अडचण हया सर्व बाबींमुळे वेळेवर वेतन न झालेने जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना नाहक मनस्ताप तसेच आर्थिक कुचंबना होत आहे.

शासकीय कर्मचाऱ्यांचे दर महिन्याचे वेतन ५ तारखेपर्यंत करण्याबाबत शासन स्तरावरून आदेश निर्गमित करण्याची विनंती केली आहे.याअनुषंगाने , जिल्हा परिषद स्तरावरून जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे वेतन दर महिन्याच्या ५ तारखेपर्यंत का होत नाही. जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे वेतन दर महिन्याच्या ५ तारखेपर्यंत होणेकरीता मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद (सर्व) यांच्या स्तरावरून केलेले प्रयोजन याचा स्वयंस्पष्ट कारणासह अहवाल शासनास दिनांक १५.०९.२०२३ पर्यंत सादर करण्यात यावे असे सूचित केले आहे.

हे पण वाचा ~  7th pay da hike : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता वाढ संदर्भात महत्त्वाचे अपडेट समोर!लवकरच होणार ....

Employees salary budget

आता जिल्हास्तरावर केवळ नियमित वेतन देयक सर्व संबंधितांकडून दरमहा 07 तारखेच्या आत अपलोड झाल्यास त्या देयकांचे अधीक्षक, वेतन पथकस्तरावर योग्य पध्दतीने एकत्रिकरण होऊन जिल्हा कोषागारात दरमहा 20 तारखेपूर्वी एकत्रित वेतनदेयक सादर झाल्यास 05 तारखेस वेतन संबंधित कर्मचार्‍याच्या खात्यात जमा करणे शक्य होणार आहे.

👉शासकीय कर्मचारी वेतन अपडेट्स संदर्भात शासन निर्णय येथे पहा 👈

This article written by Swati Ghuge form Maharashtra.She is famous Youtuber, website developer and Editor of MahEmployees.com

Leave a Comment