Close Visit Mhshetkari

Family pension : सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतन संदर्भात सरकारने घेतला मोठा निर्णय ! आता महिला कर्मचारी …..

Family pension : निवृत्तीवेतन नियम 2021 मधील 50 व्या नियमाच्या उपनियम(8) आणि उपनियम (9) मधील तरतुदीनुसार सरकारी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या जोडीदारास जिवंत असेल तर कुटुंब निवृत्तीवेतन योजनेचा लाभ मिळतो.

अनेक वेळा जोडीदाराचा मृत्यू झाल्यानंतर किंवा अपात्र ठरल्यास प्रत कर्मचाऱ्यांच्या मुलांना निवृत्त वेतनाचा लाभ मिळत असतो.

कुटुंब निवृत्ती वेतन योजना नवीन नियम

एखादी महिला सरकारी कर्मचारी किंवा निवृत्ती वेतनधारक महिला तिच्या पतीऐवजी पात्र अपत्य किंवा एकाहून अधिक अपत्यांना कुटुंब निवृत्तीवेतन मिळण्यासाठी नामनिर्देशित करू शकते का? या संदर्भात मोठ्या प्रमाणावर चौकशी किंवा विनंती अर्ज मंत्रालयाकडे प्राप्त होते अशावेळी निवृत्तीधारक कल्याण कडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.

एखाद्या सरकारी कर्मचारी महिलेच्या / भारतीय दंड संहितेतील एखाद्या कलमा अंतर्गत तक्रार दाखल केली असेल किंवा कार्यवाही प्रलंबित असेल आणि महिला सरकारी कर्मचारी/ निवृत्ती वेतनधारक महिलेचा मृत्यू झाला असेल आणि मृत्युपूर्वी तिने लेखी विनंती करावा लागेल. कुटुंब निवृत्तीवेतन खालील पद्धतीने निर्णय घेतला जाणार आहे.

Family pension scheme

  • जेथे महिला सरकारी कर्मचारी/ निवृत्तीवेतनधारक महिलेच्या मृत्यूनंतर तिचा पती जिवंत असेल आणि मृत्यू झाल्याच्या तारखेला कोणतेही अपत्य/ अपत्ये कुटुंब निवृत्तीवेतन मिळण्यास पात्र ठरत नसतील तर हे कुटुंब निवृत्तीवेतन त्या विधुराला देण्यात येईल.
  • जेथे महिला सरकारी कर्मचारी/ निवृत्तीवेतनधारक महिलेच्या मृत्यूनंतर तिचा पती जिवंत असेल आणि त्यांच्या अपत्याला,अपत्यांना मतिमंदत्व किंवा मानसिक आजार अथवा अपंगत्व असेल तर महिलेच्या मृत्यूनंतर तिचा पती कुटुंब निवृत्तीवेतन मिळण्यास पात्र ठरेल मात्र त्यासाठी पती त्यांच्या मुलांचा पालक असणे आवश्यक असणार आहे.
  • जर हा विधुर अशा मुलाचे/मुलांचे पालकत्व सोडून देत असेल तर अशा वेळी हे कुटुंब निवृत्तीवेतन त्या मुलांच्या वास्तविक पालकाला देण्यात येईल.
  • जर अल्पवयीन अपत्य, सज्ञान होण्याच्या वयात आल्यानंतर कुटुंब निवृत्तीवेतन घेण्यासाठी पात्र ठरत असेल तर अशा अपत्याला सज्ञान झाल्याच्या तारखेपासून कुटुंब निवृत्तीवेतन देय असेल.
  • जेथे मृत्यू पावलेली महिला सरकारी कर्मचारी / महिला निवृत्तीवेतन धारकाच्या मागे विधुर पती आणि सज्ञान झालेले अपत्य/अपत्ये असतील आणि ती अपत्ये कुटुंब निवृत्तीवेतन मिळण्यासाठी पात्र ठरत असतील तर हे कुटुंब निवृत्तीवेतन त्या अपत्याला/अपत्यांना देण्यात येईल.
  • निवृत्तीवेतन नियम 2021 मधील 50 व्या नियमानुसार कुटुंब निवृत्तीवेतनासाठी पात्र ठरत नसतील तर अशावेळी कुटुंब निवृत्तीवेतनासाठी पात्र एक किंवा अधिक अपत्य असल्यास हे कुटुंब निवृत्तीवेतन त्याला/त्यांना द्यावे लागेल.
  • सर्व अपत्ये  निवृत्तीवेतन नियम,2021 मधील 50 व्या नियमानुसार कुटुंब निवृत्तीवेतनासाठी पात्र ठरत नसतील तर अशावेळी त्या विधुराला त्याच्या तहहयात किंवा पुनर्विवाहापर्यंत हे कुटुंब निवृत्तीवेतन देय राहील.
हे पण वाचा ~  Salary hike : खूशखबर .. या कर्मचाऱ्यांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना व सुधारीत सेवांतर्गत आश्वासीत प्रगती योजना लागू !शासन निर्णय निर्गमित ..

This article written by Swati Ghuge form Maharashtra.She is famous Youtuber, website developer and Editor of MahEmployees.com

Leave a Comment