Smallcap Mutual Funds : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती असेल की गेल्या वर्षापासून म्युच्युअल फंडात गुंतवणुकीचा आकडा झपाट्याने वाढलेला आहे.विशेष म्हणजे इक्विटी श्रेणीतील स्मॉल कॅप फंडाची मागणी प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे.
SIP द्वारे मुच्युअल फंडातील गुंतवणुकीवर जोरदार रिटर्न्स मिळालेले आहेत.आज आपण अशा पाच फंडा बद्दल माहिती घेणार आहोत ज्यांनी मागील तीन वर्षाच्या पिरेड मध्ये तब्बल 42 % पर्यंत परतावा दिलेला आहे.
Top 5 Smallcap Mutual Funds
Quant Small Cap Fund : मागील 3 वर्षातील क्वांट स्मॉल कॅप फंडचा SIP फंडाचा परतावा सुमारे 40.04 % राहिला आहे. यामध्ये 10 हजार रुपयांची मासिक गुंतवणूक 3 वर्षांत 6,55,246 रुपयांवर पोहोचली आहे. आपण या फंडमध्ये किमान 1 हजार रुपयांच्या गुंतवणुकीपासून सुरुवात करू शकतो. विशेष म्हणजे 5 हजार रुपयांची एकरकमी गुंतवणूक सुध्दा करता येते.
Bandhan Small Cap Fund : मागील 3 वर्षातील बंधन स्मॉल कॅप फंडचा SIP परतावा सुमारे 32.04 % आहे. यामध्ये 10 हजार रुपयांची मासिक गुंतवणूक 3 वर्षांत 6,10,991 रुपये झाली आहे. आपण या फंडांमध्ये किमान 100 रुपयांच्या गुंतवणुकीपासून सुरुवात करू शकततो तर 5 हजार रुपयांची एकरकमी गुंतवणूक करता येते.
Nippon India Small Cap Fund : गेल्या 3 वर्षातील निप्पॉन इंडिया स्मॉल कॅप फंड फंडचा SIP परतावा सुमारे 36.38 % असून यामध्ये मासिक 10 हजार रुपयांची गुंतवणूक 3 वर्षांत 6,08,855 रुपयांपर्यंत वाढली आहे. आपल्याला या फंडात किमान 100 रुपयांच्या गुंतवणुकीपासून सुरुवात करू शकतो.विशेष म्हणजे आपण 5 हजार रुपयांची एकरकमी गुंतवणूक देखील करू शकता.
Franklin India Smaller Companies Fund : 3 वर्षातील फ्रँकलिन इंडिया स्मॉलर कंपनीज फंडचा SIP परतावा सुमारे 33.83 % आहे. यामध्ये मासिक 10 हजार रुपयांची गुंतवणूक 3 वर्षांत 6,03,435 रुपयांपर्यंत वाढली आहे.आपण या फंडमध्ये किमान 5000 रुपयांच्या गुंतवणुकीपासून सुरुवात करू शकता तर 500 रुपयांची एकरकमी गुंतवणूक देखील करता येते.
ITI Small Cap Fund : 3 वर्षातील आयटीआय स्मॉल कॅप फंड SIP परतावा सुमारे 26.67 % आहे. SIP मध्ये 3 वर्षात 10 हजार रुपयांची मासिक गुंतवणूक वाढून 5,97,697 रुपये झाली आहे.सदरील फंडमध्ये किमान 5 हजार रुपयांच्या गुंतवणुकीपासून सुरुवात करू शकता. तुम्ही 500 रुपयांची एकरकमी गुंतवणूक देखील करू शकता.