Close Visit Mhshetkari

ITR New Rules : आयटीआर फॉर्ममध्ये झाले नवीन बदल; आता रोख पैसे अन् बँक खात्यांबाबत द्यावी लागणार सर्व माहिती

ITR New Rule : केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाने (CBDT) आर्थिक वर्ष 2023-24 (असेसमेंट इयर 2024-25) साठी आयटीआर-1 आणि आयटीआर-4 फॉर्म जारी केले आहेत. यावर्षी ITR Form मध्ये काही बदल करण्यात आले आहेत.यामुळे करदात्यांना कॅश पेमेंट आणि बँकिंगबाबत अतिरिक्त माहिती द्यावी लागणार आहे.

New rule for ITR-1

आता करदात्यांना या आर्थिक वर्षात सक्रिय असणाऱ्या सर्व बँक खात्यांची माहिती द्यावी लागणार आहे. या सर्व खात्यांचा प्रकार देखील स्पष्ट करावा लागणार आहे.

अग्निवीर म्हणून काम करत असणाऱ्या तरुणांसाठी सेक्शन 80 सीसीएच अंतर्गत होणाऱ्या कपातीसाठी वेगळा सेक्शन दिला आहे.

ITR-4 New update

करदात्यांना या आर्थिक वर्षामध्ये कुठू-कुठून कॅशमध्ये पैसे मिळाले याची माहिती देखील द्यावी लागणार आहे. यासाठी या फॉर्ममध्ये नवीन कॉलम जोडण्यात आला आहे. यात करदाते आपल्याला मिळालेल्या रकमेची पूर्ण माहिती देऊ शकतील.

कोणता फॉर्म कुणासाठी ?

ज्या व्यक्तीचं वार्षिक उत्पन्न 50 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, आणि तिला पगार, घर/दुकान भाडं,अन्य स्त्रोतांमधून मिळणारं व्याज आणि 5 हजार रुपयांपर्यंत कृषी उत्पन्न मिळत असेल; अशी व्यक्ती आयटीआर-1 हा फॉर्म भरू शकते.

हे पण वाचा ~  Income Tax on HRA : बापरे ... 1 कोटींचा घरभाडे भत्ता? आयकर विभागाच्या रडारवर कर्मचारी; असा केला जात आहे पॅनचा बेकायदेशीर वापर ...

इंडिव्हुजुअल करदाता,अविभाजित हिंदू परिवार आणि एलएलपी यांव्यतिरिक्त इतर लोक, ज्यांची एकूण कमाई 50 लाख रुपयांपर्यंत आहे आणि कमाईचं साधन बिझनेस किंवा नोकरी आहे असे लोक आयटीआर-4 हा फॉर्म भरू शकतात.

अर्थात, तुम्ही कोणता फॉर्म भरू शकता हे तुमच्या उत्पन्नाच्या स्त्रोतावर आणि उत्पन्नाच्या पातळीवर अवलंबून असेल.

आयटीआर फॉर्म कसा भरावा?

  • आयकर विभागाच्या वेबसाइटवर जा आणि “आयटीआर फाइल करा” या पर्यायावर क्लिक करा.
  • आपल्याला हवे असलेला आयटीआर फॉर्म निवडा.
  • फॉर्ममध्ये आवश्यक माहिती भरा.
  • फॉर्मवर स्वाक्षरी करा आणि त्याची प्रत ठेवा.
  • फॉर्मची स्कॅन केलेली प्रत आयकर विभागाच्या वेबसाइटवर अपलोड करा.

आयटीआर फॉर्म भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2024 आहे.

1 thought on “ITR New Rules : आयटीआर फॉर्ममध्ये झाले नवीन बदल; आता रोख पैसे अन् बँक खात्यांबाबत द्यावी लागणार सर्व माहिती”

  1. आपल्या ब्लॉगवर अत्यंत महत्त्वाची माहिती उपलब्ध होते आहे.

    धन्यवाद.

    Reply

Leave a Comment