Close Visit Mhshetkari

Retirement age pension : सेवा निवृत्तीनंतर खर्चाचे नको टेन्शन… दरमहा 210 रुपये जमा करा अन् मिळवा 5 हजार रुपये पेन्शन

Retirement pension : आपल्यालाही तुमच्या उतार वयात चिंतामुक्त राहायचे असेल, तर आतापासूनच गुंतवणूक करायला सुरुवात करा.दरमहा फक्त 210 रुपये गुंतवणूक करून सरकारची हमी असलेले दरमहा 5 हजार रुपये पेन्शन मिळवू शकते.

सेवानिवृत्ती नंतर मिळणार पेन्शन

प्रत्येक कर्मचारी आपल्या कमाईतून छोटी का होईना बचत करण्याचा प्रयत्न करत असतो. जेणे करून उतार वयात त्याला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू नये. आज बाजारात अनेक प्रकारच्या Retirement age योजना उपलब्ध आहेत. केंद्र सरकारची APY लोकांमध्ये खूप लोकप्रिय आहे. 

अटल पेन्शन योजना वयाच्या ६० वर्षा नंतर आनंदायी जीवन जगण्यासाठी अधिक चांगली असून यामध्ये तुम्ही दरमहा रक्कम जमा केल्यास तुम्हाला सरकारकडून हमी पेन्शन मिळते.

कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती नंतर नियमित उत्पन्न मिळावे या उद्देशाने २०१५-१६ मध्ये सेवानिवृत्ती योजना म्हणून लोकप्रिय अटल पेन्शन योजना सुरू करण्यात आली होती.

सदरील योजनेचा हा मुख्य फायदा म्हणजे असे लोक जे कोणत्याही प्रकारच्या सरकारी पेन्शनचा लाभ घेऊ शकत नाहीत.या योजनेत गुंतवणूक करून निवृत्तीनंतर नियमित उत्पन्नाची खात्री करू शकतात.

हे पण वाचा ~  EPFO calculator : पीएफने केली व्याजदरात वाढ ! खातेधारक घरबसल्या असा चेक करू शकतात आपले अकाऊंट बॅलन्स

आपण आपल्या सोयीनुसार दरमहा थोडी-थोडी रक्कम बचत करून निवृत्तीनंतर १ हजार ते ५ हजार रुपयांपर्यंत मासिक पेन्शनचा लाभ घेता येतो.अटल पेन्शन योजनेत गुंतवणुक करण्यासाठी 18 ते 40 वर्षे वयोमर्यादा आहे.

APY पेन्शन योजना नवीन नियम

केंद्र सरकारने मागीलवर्षी योजनेच्या नियमात बदल केला आहे.सरकारच्या नवीन नियमानुसार आयकरदात्यांना योजनेचा लाभ घेण्यापासून अपात्र घोषित करण्यात आले आहे. 

दिनांक १ ऑक्टोबर २०२२ पासून अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांना आयकरात सूट देण्याची तरतूद आहे.

अटल पेन्शन योजनेत कमी वयात गुंतवणूक सुरू केली तर तितका फायदा होतो.आपण आपल्या सोयीनुसार गुंतवणुकीची रक्कम कमी जास्त करू शकता.

विशेष म्हणजे या योजनेत जर ६० वर्षापूर्वी गुंतवणूकदाराचे निधन झाल्यास पती/पत्नी अटल पेन्शन योजना खात्यात गुंतवणूक सुरू ठेवू शकते.

पेन्शन योजने संदर्भात सविस्तर माहिती येथे पहा

Leave a Comment