Close Visit Mhshetkari

Election Duty Allowance : लोकसभा निवडणुक कामासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांना द्यावयाच्या निवडणूक भत्त्याबाबत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित …

Election Duty Allowance : भारत निवडणूक आयोगाच्या अखत्यारितीत लोकसभा/विधानसभा सार्वत्रिक/पोट निवडणुकांच्या कामासाठी नियुक्त करण्यात येणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना द्यावयाच्या निवडणूक भत्त्याचे दर निश्चित करण्यासंदर्भात शासन निर्णयान्वये निश्चित केलेले आहेत.

Election Duty Allowance Rate

लोकसभा / विधानसभा सार्वत्रिक / पोट निवडणुकींच्या वेळी मतदान / मतमोजणीच्या कामासाठी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांना / कर्मचाऱ्यांना देण्यात द्यावयाच्या निवडणूक भत्त्याबाबतचा दिनांक १८ मार्च, २०१४ रोजीचा संदर्भाधिन शासन निर्णय अधिक्रमित करण्यात आला आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या पत्र क्रमांक ४६४/INST/EPS/२०२३ /Remuneration & TA/DA, दिनांक ०६.०६.२०२३ व क्रमांक- ४६४/INST/EPS/२०२३/Remuneration & TA/DA, दिनांक १७.११.२०२३ अन्वये देण्यात आलेल्या सूचनांना अनुसरुन महाराष्ट्र राज्यातील लोकसभा / विधानसभा सार्वत्रिक/पोट निवडणुकांच्या मतदान / मतमोजणी कर्तव्यार्थ नियुक्त करण्यात येणाऱ्या अधिकारी / कर्मचारी यांना पुढीलप्रमाणे निवडणूक भत्ता मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

निवडणूक कामासाठी निवडणूक भत्त्या दर

(१) मतदान केंद्र / मतमोजणी केंद्रावर प्रत्यक्ष तैनात करण्यात आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनाही वरील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे भत्त्याचे दर लागू राहतील.

(२) प्रशिक्षणासाठी उपस्थित राहणाऱ्या, मतदानाचे साहित्य ताब्यात घेणाऱ्या तसेच मतदान व मतमोजणीच्या दिवशी प्रत्यक्ष मतदान / मतमोजणी कर्तव्यार्थ उपस्थित राहणाऱ्या कार्यरत व राखीव अधिकारी / कर्मचारी यांना वरील तक्त्यात नमूद केलेल्या दराप्रमाणे निवडणूक भत्ता अनुज्ञेय राहील.

(३) हा निवडणूक भत्ता सार्वत्रिक तसेच पोट निवडणुकांसाठी दिला जाईल.

हे पण वाचा ~  Election Duty : निवडणूक कर्तव्यावर जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांना व मृत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुबियांना मिळणार " एवढे" सानुग्रह अनुदान !

(४) दूर्गम प्रदेशातील (difficult terrain) मतदान केंद्रांवर संबंधित मतदान पथकास (Polling official) ३ किंवा त्याच्यापेक्षा जास्त दिवस आगोदर निघावे लागते, त्या मतदान पथकातील अधिकारी व कर्मचारी यांना सामान्य दरा पेक्षा दुप्पट दराने निवडणूक भत्ता अनुज्ञेय राहील. 

(५) निवडणूक भत्त्या व्यतिरिक्त, सर्व मतदान केंद्रांवर / मतमोजणी केंद्रांवर निवडणूक संबंधित कामासाठी तैनात मतदान कर्मचाऱ्यांसह पोलिस कर्मचारी, मोबाईल पार्टीमधील कर्मचारी, होमगार्ड, वनरक्षक ग्राम रक्षक दल, NCC कैडेट्स, माजी सैनिक, स्वयंसेवक इत्यादींसाठी पॅक केलेले दुपारचे जेवण आणि/किंवा हलका अल्पोहार प्रदान केला जाईल.

(६) उपरोक्त पध्दतीनुसार मतदान कर्मचारी / पोलीस कर्मचारी आणि निवडणूक कामासाठी नियुक्त केलेले इतर अधिकारी / कर्मचारी याना TA/DA ची अदागयी करण्यासंदर्भात प्रकरणपरत्वे मूळ विभाग अथवा निवडणूक विभाग यांच्याकडून कार्यवाही करण्यात यावी. (७) अधिकारी / कर्मचारी यांना प्रवास भत्ता / दैनिक भत्ता (TA/DA) देताना तो त्या-त्या वेळी अनुज्ञेय असलेल्या दराने देय होईल.

उपरोक्त बाबींवर होणारा खर्च प्रकरणपरत्वे मागणी क्र. ए-०२, २०१५-निवडणुका, १०५-संसदेच्या निवडणुका घेण्यासाठी लागणारा खर्च” किंवा “२०१५-निवडणुका, १०६ राज्य/संघराज्य क्षेत्र विधानमंडळ निवडणुका घेण्यासाठी लागणारा खर्च” किंवा “२०१५-निवडणुका, १०४-लोकसभा व राज्य संघराज्य क्षेत्र विधानसभा यांच्या एकास वेळेस घेतल्या जाणाऱ्या निवडणुकांचा खर्च हया लेखाशीर्षाखालील मंजूर अनुदानातून भागविण्यात भागविण्यात येणार आहे.

Leave a Comment