Close Visit Mhshetkari

Income Tax Return : मोठी बातमी…आता आयकर परतावा भरण्यासाठी सीएची आवश्यकता नाही! पहा सविस्तर

Income Tax Return Tips  :   आज जुलैचे 4 दिवस उलटून गेले आहेत आणि केवळ 31 तारखेपर्यंत इन्कम टॅक्स रिटर्न  भरण्याची संधी आहे. कराशी संबंधित अनेक नियमांमध्ये बदल केल्यानंतर आता करदात्यांच्या मनात विविध प्रश्न निर्माण होत आहेत.

आयकर विभागाकडून याची सुरुवात झाली आहे. तुम्हीदेखील आयकर परतावा दाखल करणार असाल तर काही गोष्टींकडे विशेष लक्ष द्यायामध्ये सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न म्हणजे ऑडिटशिवाय रिटर्न भरता येईल का ? कोणत्या प्रकारच्या करदात्यांना ऑडिट करणे आवश्यक आहे.

ज्यांना सूट देण्यात आली आहे त्यांच्यासाठी कोणत्या अटी आहेत. ऑडिट न करता टॅक्स रिटर्न भरल्यास काय होईल?

करदात्यांनी त्यांचे विवरणपत्र लवकर सादर करावे

GST नेटवर्कने करदात्यांना रिटर्न भरण्यासाठी आणि इनव्हॉइस अपलोड करण्यासाठी वेळ दिला आहे. जीएसटी नेटवर्कने सांगितले की, 20 एप्रिल रोजी 20.05 लाख जीएसटीआर-3बी रिटर्न सबमिट करण्यात आले होते.

वस्तू आणि सेवा कर नेटवर्क (GSTN) अप्रत्यक्ष कर प्रणालीशी संबंधित तंत्रज्ञानाचे व्यवस्थापन करते. सध्या जीएसटी अंतर्गत 1.39 कोटीहून अधिक करदात्यांची नोंदणी झाली आहे.

ITR भरणे सोपे झाले

प्राप्तिकर विभाग प्रत्येक करदात्याला AIS आणि TIS नावाची दोन कागदपत्रे उपलब्ध करून देतो. ही दोन्ही अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे आहेत. आयटीआर फायलींगमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आणि करदात्यांना सेल्फ-फाइलिंग करणे सोपे करण्यासाठी विभागाने या दोन्ही गोष्टी सुरू केल्या आहेत. या दोन्ही कागदपत्रांच्या मदतीने तुम्ही तुमचे आयकर रिटर्न सहज भरू शकता आणि यासाठी तुम्हाला सीएची गरज भासणार नाही.

  • ही कागदपत्र आवश्यक
  • फॉर्म 16
     फॉर्म 16 ए
    फॉर्म 26 एएस
    कॅपिटल गेन स्टेटमेंट
    टॅक्स सेव्हिंग इन्वेस्टमेंट प्रुफ
हे पण वाचा ~  Income tax : आयकर विभाग पाठवू शकतो 6 प्रकारची नोटीस? चूक केली तर तुम्हालाही मिळू शकते!
   From भरण्याची प्रक्रिया
  1. आयटीआर फाईल करण्यासाठी सर्वात अगोदर इनकम टॅक्सच्या ई-फाईलिंग पोर्टलवर जा
  2. तुमचा युझर आयडी (पॅनकार्ड), पासवर्ड आणि कॅप्चा कोड टाकून लॉगिन करा
  3. e-file मेन्यूवर क्लिक करा. इनकम टॅक्स रिटर्न लिंकवर क्लिक करा
  4. उत्पन्नाआधारे योग्य आयकर रिटर्न फॉर्म पर्याय निवडा
  5. वेतनदार असाल तर Form 16 जवळ ठेवा.
  6. Form 16 आधारे आयटीआर-1, आयटीआर-2 यापैकी एक पर्याय निवडा
  7. मुल्यांकन वर्ष (Assessment Year) निवडा. सध्या मुल्यांकन वर्ष 2023-24 साठी पर्याय निवडता येईल
  8. बारकाईने सर्व अर्ज भरा. योग्य माहिती जमा केली की नाही, ते एकदा तपासून पहा.

Leave a Comment