Close Visit Mhshetkari

PPF व्याजदर पीपीएफ खतेदरासाठी मोठी अपडेट सरकारने केली पीपीएफ व्याजाची घोषणा घ्या जाणून

PPF मध्ये देखील गुंतवणूक केली असेल तर ही बातमी तुम्हाला आनंदित करेल. पुढील महिन्यात म्हणजेच 30 जून रोजी जुलै-सप्टेंबर तिमाहीसाठी लहान बचत योजनांवरचे व्याज वित्त मंत्रालयाकडून जाहीर केले जाईल. यावेळी अर्थ मंत्रालयाकडून पीपीएफच्या व्याजदरात वाढ अपेक्षित आहे. 

जाणून घ्या पीपीएफ खाते म्हणजे काय 

सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी पीपीएफ योजना हा एक दीर्घकालीन गुंतवणूक पर्याय आहे जो आकर्षक व्याज दर आणि गुंतविलेल्या रकमेवर निश्चित परतावा देतो. मिळालेले व्याज आणि परतावा प्राप्तिकर कायद्याअंतर्गत करपात्र नाहीत. या योजनेंतर्गत एखाद्याला पीपीएफ खाते उघडावे लागेल आणि एका वर्षात जमा केलेल्या कमाल दीड लाख रुपयांपर्यंतच्या रकमेवर कलम ८०सी अंतर्गत वजावट अंतर्गत कर वजावटीसाठी दावा करता येईल. म्हणजे निश्चित उत्पन्नाची हमी, जोखीम मुक्त परतावा, करवजावट तसेच करमुक्त लाभ असे पीपीएफ खात्याचे फायदे आहेत.

बचत योजनांवर व्याजदर वाढला

अर्थ मंत्रालय लहान बचत योजना आणि पोस्ट ऑफिस योजनांचे दर तीन महिन्यांनी पुनरावलोकन करून व्याजदर वाढवण्याचा निर्णय घेते. वित्त मंत्रालयाने ३१ मार्च २०२३ रोजी व्याजदरात वाढ केल्याची घोषणा करून लहान बचत योजनांच्या १२ बचत योजनांपैकी १० बचत योजनांचे व्याजदर वाढवले आहेत. विशेष म्हणजे पोस्ट ऑफिसच्या सर्व योजनांवरीलही व्याजदर वाढवण्यात आले आहेत.

सरकारी कर्मचारी,पगार महागाई भत्ता, सातवा वेतन आयोग, शासन निर्णय शैक्षणिक, राजकीय क्षेत्रांशी संबधित ताज्या माहितीसाठी आमचा व्हाट्सॲप गृह जॉईन करा

हे पण वाचा ~  PPF Withdraw Rules : आपल्या PF खतातील पैसे काढण्याचे नविन नियम माहिती आहे का ? जाणून घ्या सविस्तर

Join WhatsApp Group

योजनेवर मोठा फायदा

गुंतवणुकीच्या दृष्टीने पीपीएफ ही जोरदार योजना आहे. ही योजना EEE श्रेणी अंतर्गत येते. तर गुंतवणुकीवर कलम ८०सी अंतर्गत कर सूटही मिळते. तसेच रिटर्न आणि मॅच्युरिटी देखील पूर्णपणे करमुक्त आहे. या योजनेतील व्याज दर तिमाहीत ठरवले जाते आणि व्याजाची गणना वार्षिक चक्रवाढ आधारावर करण्यात येते . या योजनेत एका आर्थिक वर्षात किमान ५०० रुपये आणि कमाल १.५ लाख रुपये  गुंतवनुक करू शकता, तर योजनेचा परिपक्वता कालावधी १५ वर्षांचा आहे गुंतवणुकीच्या दृष्टीने पीपीएफ ही योजना उत्तम आहे.

FD गुंतवणूक करण्याअगोदर हे नियम पहा, अथवा याल अडचणीत

बचत योजना नियम

व्याजदर वाढवू शकते,

आरबीआयच्या माध्यमातून अशी वाढ करण्यात आल्याने मोदी सरकार आता मोठ्या योजनांमधील व्याजदर वाढवू शकते, असे मानले जात आहे. अशा स्थितीत 1 वर्षाची एफडी योजना, 5 वर्षांची एफडी योजना, 5 वर्षांची आरडी योजना, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजना, सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी योजना आणि सुकन्या समृद्धी योजनेतव्याजदरात अर्धा टक्का वाढ केली होती. व्याजदरात वाढ करणे अपेक्षित आहे. सरकारने गेल्या 12 तिमाहींपासून पीपीएफच्या व्याजदरात कोणताही बदल केलेला

त्यावेळी पीपीएफचा व्याजदर 7.10 टक्के जुन्या पातळीवर कायम ठेवण्यात आला होता. त्यावेळी जुन्या व्याजदरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

सर्वाधिक व्याजदर देणाऱ्या लहान बचत योजना यादी येथे पहा

बचत योजना यादी

This article written by Swati Ghuge form Maharashtra.She is famous Youtuber, website developer and Editor of MahEmployees.com

Leave a Comment