Close Visit Mhshetkari

Family pension : खुशखबर… राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतन संदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित! आता…

Family pension : वित्त विभागाच्या संदर्भाधीन शासन निर्णयास अनुसरुन परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत असलेल्या कर्मचान्याच्या मृत्युपश्चात त्याचे कुटुंबाने नमुना-३ भरला आहे.महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२ प्रमाणे कुटुंब निवृत्तिवेतनाचा लाभ मिळण्याबाबतच्या विकल्पाची निवड केली असल्यास त्यानुषंगाने कुटुंब निवृत्तिवेतन आणि मृत्यु उपदान अनुज्ञेय करण्यासाठी कार्यवाही करण्यात येणार आहे.

NPS DCPS Amount latest updates

परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत रुग्णता निवृत्त झालेला कर्मचारी महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२ अंतर्गत रुग्णता निवृत्तिवेतन मिळण्यास पात्र ठरत असल्यास व सदर कर्मचाऱ्याने संदर्भाधीन शासन निर्णयास अनुसरुन रुग्णता निवृत्तिवेतन अनुज्ञेय करणे, या विकल्पाची (नमुना-३ नुसार) निवड केली असल्यास, त्यानुषंगाने रुग्णता निवृत्तिवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान अनुज्ञेय करण्यासाठी सोबत जोडलेल्या परिशिष्ट-२ प्रमाणे कार्यवाही करण्यात येणार आहे.

DCPS / NPS अंतर्गत सेवेत असलेल्या कर्मचाऱ्याने संदर्भाधीन शासन निर्णयास अनुसरुन त्या सोबतच्या नमुना-२ अन्वये महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम १९८२ प्रमाणे रुग्णता निवृत्तिवेतन / कुटुंब निवृत्तिवेतनाचा लाभ मिळण्याबाबतच्या विकल्पाची निवड केली असल्यास त्यानुषंगाने रुग्णता निवृत्तिवेतन / कुटुंब निवृत्तिवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान / मृत्यु उपदान अनुज्ञेय करण्यासाठी सोबत जोडलेल्या परिशिष्ट -३ प्रमाणे कार्यवाही करण्यात येईल.

कुटुंब निवृत्ती वेतन वारस बदलता येणार

वित्त विभाग, शासन निर्णय दिनांक ३१.०३.२०२३ नुसार कार्यरत असणान्या ज्या शासकीय कर्मचाऱ्याने त्याचा सेवेत असताना मृत्यु झाल्यास किंवा तो रुग्णता सेवानिवृत्त झाल्यास यथास्थिती त्याच्या कुटुंबाला कुटुंब निवृत्तिवेतन/ त्याला रुग्णता निवृत्तिवेतन अनुज्ञेय करण्याचा विकल्प नमुना-२ मध्ये सादर केला आहे, अशा कर्मचाऱ्याला तो सेवानिवृत्त होईपर्यंत सदरचा विकल्प बदलण्याची मुभा असेल. 

हे पण वाचा ~  NPS Changes : अर्थसंकल्पात NPS बदलाचा फटका की फायदा ? पहा 50 हजार पगार असेल तर काय होणार परिणाम? पहा सविस्तर

कर्मचाऱ्याने वेळोवेळी सादर कैलेल्या विकल्पाची नोंद आहरण व संवितरण अधिकाऱ्याने कर्मचान्याच्या सेवापुस्तकात तत्परतेने घ्यावी लागणार आहे.तसेच सदर विकल्पाची व त्याची नोंद घेतलेल्या सेवापुस्तकाच्या पानाची साक्षांकित सत्यप्रत अधिदान व लेखा अधिकारी/ जिल्हा कोषागार अधिकाऱ्यामार्फत केंद्रीय अभिलेख देखभाल अभिकरण (CRA-Protean) यांच्याकडे अभिलेखासाठी पाठवावी लागेल.

विकल्प देणे हा कर्मचाऱ्याचा अधिकार असल्यामुळे कर्मचाऱ्याने तो हयात असताना दिलेला विकल्प, त्याच्या मृत्युपश्चात त्याच्या कुटुंबियांना कोणत्याही परिस्थितीत बदलता येणार नाही.. 4. महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२ मधील नियम १३२ मध्ये नमूद केल्यानुसार “शासनाला येणे असलेल्या रकमा प्रथमतः सेवानिवृत्ती उपदान / मृत्यु उपदान यामधून वसुल करण्यात येणार आहे.

Family pension and gratuity

शासनाच्या सेवेतून निवृत्त झालेल्या / होणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सेवानिवृत्ती उपदानाचा प्रस्ताव सोबतच्या नमुन्यात परिपूर्ण भरुन मूळ सेवापुस्तकासह उपदानाच्या मंजूरीसाठी महालेखापाल कार्यालयास सादर करण्यात येईल. महालेखापाल कार्यालयाकडून प्रकरण मंजूर झाल्यानंतर प्रचलित पध्दतीने उपदान अदा करणेबाबत आहरण व संवितरण अधिकाऱ्याने कार्यवाही करावी. 

कुटुंब निवृत्तीवेतन योजना लाभ विकल्प, लाभ कार्यपद्धती व शासन निर्णय येथे पहा

Leave a Comment