Family pension : राज्यातील अकृषि विद्यापीठे, अनुदानित महाविद्यालये, तंत्र शिक्षण संचालनालय व कला संचालनालय याच्या नियंत्रणाखालील अशासकीय अनुदानित महाविद्यालये / संस्था, डॉ. बाबासाहेब आबेडकर तंत्र शास्त्र विद्यापीत लोणेरे, सीओइपी तंत्रज्ञान विद्यापीठ पुणे, अनुदानित अभिमत विद्यापीठे इत्यादींमधील कर्मचान्यासंदर्भात सूचना निर्गमित करण्यात आला आहे.
Family pension and gratuity
उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या दिनांक २५ मे २०२३ च्या शासन निर्णयास अनुसरुन परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत असलेल्या कर्मचाऱ्याच्या मृत्युपश्चात त्याच्या कुटुंबाने सदर्भाधीन शासन निर्णयासोबतच्या नमुना-३ अन्वये महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२ प्रमाणे कुटुं निवृत्तिवेतनाचा लाभ मिळण्याच्या विकल्पाची निवड केली असल्यास त्यानुषंगाने कुटुंब निवृत्तिवेतन आणि मृत्यु उपदान अनुज्ञेय करण्यासाठी कार्यवाही करण्यात येणार आहे.
परिभाषित अंशदान निवृत्तिवेतन योजना / राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली अंतर्गत रुग्णता निवृत्त झालेला कर्मचारी महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२ अंतर्गत रुग्णता निवृत्तिवेतन मिळण्यास पात्र ठरत असल्यास व सदर कर्मचाऱ्याने संदर्भाधीन शासन निर्णयास अनुसरून रुग्णता निवृत्तिवेतन अनुज्ञेय करणे, या विकल्पाची (नमुना- ३ नुसार निवड केली असल्यास, त्यानुषंगाने रूग्णता निवृत्तिवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान अनुज्ञेय करण्यासाठी कार्यवाही करण्यात येईल.
DCPS/ NPS अंतर्गत सेवेत असलेल्या कर्मचाऱ्याने सदर्भाधीन शासन निर्णयास अनुसरुन त्या सोबतच्या नमुना- २ अन्वये महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तिवेतन) नियम, १९८२ प्रमाणे रुग्णता निवृत्तिवेतन / कुटुंब निवृत्तिवेतनाचा लाभ मिळण्याबाबतच्या विकल्पाची निवड केली असल्यास, त्यानुषंगाने रुग्णता निवृत्तिवेतन / कुटुंबनिवृत्तिवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान / मृत्यु उपदान अनुज्ञेय करण्यासाठी कार्यवाही करण्यात येईल.
रूग्णता निवृत्तिवेतन आणि सेवानिवृत्ती उपदान
उच्च व तंत्र शिक्षण विभाग, शासन निर्णय दिनांक २५.०५.२०२३ नुसार कार्यरत असणाऱ्या ज्या कर्मचाऱ्याने त्याचा सेवेत असताना मृत्यु झाल्यास किंवा तो रुग्णता सेवानिवृत्त झाल्यास यथास्थिती त्याच्या कुटुबाला कुटुब निवृत्तिवेतन / त्याला रुग्णता निवृत्तिवेतन अनुज्ञेय करण्याचा विकल्प नमुना-२ मध्ये सादर केला आहे.
कर्मचाऱ्याला तो सेवानिवृत्त होईपर्यंत सदरचा विकल्प बदलण्याची मुभा असेल कर्मचाऱ्याने वेळोवेळी सादर केलेल्या विकल्पाची नोंद आहरण व संवितरण अधिकाऱ्याने कर्मचान्याच्या सेवापुस्तकात तत्परतेने घेण्यात येणार आहे.
सदर विकल्पाची व त्याची नोंद घेतलेल्या सेवापुस्तकाच्या पानाची साक्षांकित सत्यप्रत अधिदान व लेखा अधिकारी / जिल्हा कोषागार अधिकाऱ्यामार्फत केंद्रीय अभिलेख देखभाल अभिकरण (CRA-Protean) यांच्याकडे अभिलेखासाठी पाठवावी.विकल्प देणे हा कर्मचाऱ्याचा अधिकार असल्यामुळे कर्मचाऱ्याने तो हयात असताना दिलेला विकल्प, त्याच्या मृत्युपश्चात त्याच्या कुटुंबियाना कोणत्याही परिस्थितीत बदलता येणार नाही.
सरकारी कर्मचारी कुटुंब निवृत्तीवेतन व ग्रॅज्युएटी संदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय येथे पहा