GPF Interest Rate : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत आनंदाच्या आणि महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. अर्थ मंत्रालयाने भविष्य निर्वाह निधी व इतर भविष्य निर्वाह निधीचे व्याजदर मध्ये मोठा बदल केलेला आहे.
Provident Fund new interest rate
१ जानेवारी २०२४ ते ३१ मार्च २०२४ पर्यंत GPF आणि इतर तत्सम फंड्सवर ७.१ % व्याज दिले जाईल. जानेवारी-मार्च २०२४ तिमाहीसाठी सरकारने PF आणि तत्सम लिंक्ड फंडांवरील व्याजदरात कोणतीही बदल केलेला नाही.
भारत सरकारच्या अर्थमंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाकडून 2 जानेवारी 2024 रोजी 2023 24 या वर्षातील सामान्य भविष्य निर्वाह निधी आणि तत्सम भविष्य निर्वाह निधी यांच्या फंडावर १ जानेवारी २०२४ ते ३१ मार्च २०२४ पर्यंत ७.१ टक्के दराने व्याज दिले जाईल.
भविष्य निर्वाह निधी संघटन
केंद्र सरकारने मागील मागील वर्षाप्रमाणे याही वर्षी व्याजदर कायम ठेवले आहेत जीपीएफ प्रमाणेच पीएफ वर सुद्धा व्याज मिळणार आहे सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी दरांसारखेच असतात.खाली नमूद केलेल्या सर्व फंडांवर ७.१ टक्के दराने व्याजही मिळेल.
सामान्य प्रयोजन पण म्हणजे काय याचा विचार करायचा झाल्यास सामान्य भविष्य निर्वाह निधी हा भविष्य निर्वाह निधीचा एक प्रकार आहे,जो फक्त भारतीय सरकारी कर्मचाऱ्यांना दिला जातो.
सरकारी कर्मचारी आपल्या पगारातील काही भाग सामान्य भविष्य निर्वाह निधीमध्ये जमा करून घेतो.कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर त्याच्या कालावधीत जमा झालेला पैसा व्याजासह कर्मचाऱ्याला परत मिळत असतो. अर्थ मंत्रालय प्रत्येक वेळी माहितीसाठी जीपीएफ मधील पैशाच्या व्याजदराबाबत आढावा घेत असते.