Pension Nominee : सद्य:स्थिती महाराष्ट्र नागरी सेवा ( निवृत्तिवेतन) नियम, १९८२ मधील तरतुदीनुसार सेवानिवृत्ती लाभाची प्रकरणे वित्त विभागाच्या दि.०२.०७.२०१५ च्या शासन निर्णयाप्रमाणे महालेखापालांकडे ऑनलाईन पध्दतीने सादर केली जातात.
Online Nominee Registration process
प्रचलित कार्यपध्दतीप्रमाणे राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणालीतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्ती उपदानाचे प्रस्ताव ऑनलाईन कार्यपध्दतीने सादर करण्यासाठी सेवार्थ प्रणालीमध्ये आवश्यक ते फेरफार करण्यास लागणारा कालावधी विचारात घेता, सद्य:स्थितीत प्रस्तुत शासन निर्णयाच्या अनुषंगाने सादर करण्यात येणारे सेवानिवृत्ती उपदानाचे प्रस्ताव महालेखापाल कार्यालयांकडे ऑफलाईन पध्दतीने सादर करावेत.
कुटुंब निवृत्तीवेतन योजना कार्यपद्धती
तथापि, सदर शासन निर्णयास अनुसरुन मंजूर करण्यात येणारे कुटुंब निवृत्तिवेतन व मृत्यु उपदान / रुग्णता निवृत्तिवेतन व सेवानिवृत्ती उपदान याबाबतचे प्रस्ताव वित्त विभागाच्या दि.०२.०७.२०१५ च्या शासन निर्णयानुसार ऑनलाईन पध्दतीनेच सादर करण्यात यावेत.
जिल्हा परिषदा, मान्यता प्राप्त व अनुदानित अशासकीय प्राथमिक व माध्यमिक शाळा, कृषितर विद्यापिठे व त्यांच्याशी संलग्नित मान्यता प्राप्त व अनुदानित अशासकीय महाविद्यालये तसेच कृषी विद्यापिठे व तत्सम अनुदानित संस्थामधील कर्मचान्यांना वरील निर्णय योग्य त्या फेरफारासह लागू राहील. मात्र याबाबत स्वतंत्र आदेश संबंधित मंत्रालयीन प्रशासकीय विभागांनी निर्गमित करण्याबाबतची कार्यवाही त्यांच्या स्तरावरुन करावी.
कुटुंब निवृत्तीवेतन योजना विकल्प सविस्तर माहिती व शासन निर्णय येथे पहा
1 thought on “Pension nominee : मोठी बातमी एनपीएस डीसीपीएस कुटुंब निवृत्तीवेतन योजना लाभ असा मिळणार! शासन निर्णय निर्गमित”