Close Visit Mhshetkari

UPS Calculation : जर 50 हजार रुपये पगार असेल तर तुम्हाला UPS अंतर्गत किती पेन्शन मिळेल ? जाणून घ्या सविस्तर माहिती …

UPS Calculation : नमस्कार मित्रांनो नुकतीच केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी युनिफाइड पेन्शन स्कीम (UPS) आणली आहे. सदरील योजना 1 एप्रिल 2025 पासून म्हणजेच आर्थिक वर्ष 2026 पासून लागू केली जाईल. 

Unified pension scheme Calculation

सरकारी कर्मचाऱ्यांना निश्चित पेन्शन देण्यासंदर्भात सरकारने आताही यूनिफाईड पेन्शन स्कीम आणलेली आहे.कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास कुटुंब निवृत्ती वेतनाचीही तरतूद आहे.जर तुम्हाला जर 50 हजार रुपये पगार असेल तर तुम्हाला UPS अंतर्गत किती पेन्शन मिळेल? जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती. 

UPS अंतर्गत,आता सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना शेवटच्या पगाराच्या 12 महिन्यांच्या सरासरी मूळ वेतनाच्या 50 टक्के निश्चित पेन्शन दिली जाणार आहे.पण पेन्शन मिळवण्यासाठी कर्मचाऱ्यांना किमान 25 वर्षे सेवा आवश्यक असणार आहे.

मूळ वेतन 50 हजार तर पेन्शन किती ?

आपण सरकारी कर्मचारी असाल आणि आपण NPS ऐवजी UPS निवडले तर आणि आपला शेवटच्या 12 महिन्यांचा सरासरी मूळ वेतन 50 हजार रुपये असेल, तर आपल्याला निवृत्तीनंतर प्रत्येक महिन्याला 25 हजार रुपये पेन्शन आणि महागाई मदत (DR) जोडली जाईल.

हे पण वाचा ~  EPFO Update : पीएफ खात्यास आपला मोबाइल नंबर घरबसल्या कसा कराल अपडेट? पहा ऑनलाईन प्रोसेस ...

युनिफाइड पेन्शन स्कीम म्हणजे काय?

केंद्रीय मंत्रिमंडळाने शनिवारी युनिफाइड पेन्शन स्कीमला मंजुरी दिली आहे. 

  • आता UPS अंतर्गत निश्चित पेन्शन म्हणून देण्यात येणार आहे. 
  • कर्मचाऱ्यांना पूर्ण लाभ घेण्यासाठी किमान 25 वर्षे सेवा करावी लागणार आहे.
  • कर्मचाऱ्याची 10 वर्षे सेवा झाल्यास किमान 10 हजार रुपये निवृत्ती वेतन दिले जाईल.
  • कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास सरकारी कर्मचाऱ्याला मिळणाऱ्या पेन्शनच्या 60 टक्के किमान खात्रीशीर पेन्शन कुटुंबाला दिले जाईल,
  • महागाई वाढली की,DA वाढ करण्याची तरतूद.
UPS मध्ये किती योगदान द्यावे लागेल?

सरकारच्या Unifide Pension Scheme योजनेंतर्गत NPS प्रमाणे वेतनातून 10 % योगदान द्यावे लागेल. सरकारने UPS मधील योगदान 14 % वरून 18.5 % केले आहे.

Leave a Comment