PPF schemes : आपण जर पब्लिक प्रोव्हिडेंट फंड (PPF), नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (NSC) आणि नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट (SCSS) सारख्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक केली असेल, तर तुमचे खाते गोठवल जाऊ शकते. या खात्यांशी तुमचा आधार लिंक करणे आवश्यक आहे. त्यासाठी ३० सप्टेंबर २०२३ ही शेवटची मुदत ठेवण्यात आली आहे.
Aadhaar Linking with small savings schemes
पीपीएएफ योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुम्ही पोस्ट ऑफिस किंवा बँकेत खाते उघडले असेल, अशा परिस्थितीत या खात्यांशी आधार लिंक करणे अत्यावश्यक करण्यात आले आहे. ३० सप्टेंबरपर्यंत तुमचे आधार या योजनांशी लिंक न केल्यास तुमचे खाते गोठवले जाणार आहे.
आपल्याला माहिती असेल की, केंद्रीय अर्थ मंत्रालयानं छोट्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आधार अनिवार्य केले आहे.या स्थितीत ज्या ग्राहकांनी यापूर्वी ही खाती उघडली आहेत त्यांच्या खात्यांशी आधार लिंक करणे सुध्दा बंधनकारक असणार आहे. यासाठी सरकारने ही मुदत ३० सप्टेंबर २०२३ पर्यंत वाढवलेली आहे. केंद्र सरकारने यापूर्वी ३१ मार्च २०२३ रोजी अधिसूचना जारी केली होती.
PF Account – Aadhaar link process
आपण आपले आधार – पीएफ खाते लिंक केले नाही, तर या योजनांचे व्याज तुमच्या खात्यात जमा होणार नाही. तुमचे खाते गोठवले जाऊ शकते तसेच मॅच्युरिटीची रक्कमही मॅच्युरिटीनंतर जमा होण्यास अडचणी येऊ शकतात.
आपण ऑनलाइन आणि ऑफलाइन या दोन्ही पद्धतीने आधार लिंक करू शकता.ऑफलाइन आधार लिंक करण्यासाठी, तुम्हाला पोस्ट ऑफिस किंवा बँकेच्या शाखेत जावे लागते.
पोस्ट ऑफिस मध्ये आधार लिंकिंग फॉर्म भरून आधार कार्डाच्या झेरॉक्स प्रतीसह आवश्यक कागदपत्रे जमा करावे. ऑनलाइन आधार लिंक करण्यासाठी पोस्ट ऑफिसच्या वेबसाइट किंवा बँकेच्या वेबसाइटद्वारे करू शकता.