Close Visit Mhshetkari

Retirement age : राज्य सरकारी कर्मचारी सेवानिवृत्ती वय, आश्र्वासित प्रगती योजना,जुनी पेन्शन योजना संदर्भात मुख्य सचिव इतिवृत्त समोर …

Retirement age : राज्य सरकारी अधिकारी/कर्मचाऱ्याच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या संदर्भात मा.मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दिनांक ०६.११.२०२३ रोजी सायंकाळी ०५.०० वाजता मा.मुख्य सचिव यांचे समिती कक्ष येथे आयोजित करण्यात आली होती.मा. मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली अधिकारी / कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्याबाबत आयोजित बैठकीचे इतिवृत्त समोर आले आहे.

State employees Maharashtra

राज्य सरकारी अधिकारी / कर्मचान्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना व राज्य सरकारी गट ड ((चतुर्थश्रेणी कर्मचारी मध्यवर्ती महासंघ, महाराष्ट्र यांच्या पदाधिकाऱ्यांसोबत दिनांक ०६.११.२०२३ रोजी मा. मुख्य सचिव महोदयांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या मंत्रालयीन दालनात अपर मुख्य सचिव (सेवा), अपर मुख्य सचिव (वित्त) व सचिव (साविस) यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती.

हे पण वाचा ~  Employees reservation : सरकारी कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती संदर्भात नवीन शासन निर्णय निर्गमित दि. 20/4/2023

सदर बैठकीत खालील विविध प्रलंबित मागण्यांच्या अनुषंगाने सविस्तर चर्चा करण्यात आली आहे. मा. मुख्यमंत्री महोदयांकडे महत्वाच्या प्रलंबित मागण्यांबाबत चर्चा करण्यासाठी बैठक प्रस्तावित करण्यात येईल असे बैठकीत नमूद करण्यात आले.

सरकारी कर्मचारी मागण्या पूर्ण होणार!

मा.मुख्य सचिव यांनी सर्व संघटनांच्या अधिकारी / पदाधिकाऱ्यांना आगामी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर संप / आंदोलन न करण्याची विनंती केली. पदाधिकाऱ्यांनी या संदर्भात संघटनेच्या सर्व सदस्यांशी विचारविनिमय करुन सकारात्मक, सेवानिवृत्ती वय, आश्र्वासित प्रगती योजना, जुनी पेन्शन योजना, या सह विविध निर्णय घेण्यात येईल असे सांगितले आहे.

Leave a Comment