Close Visit Mhshetkari

SIP vs Home Loan || आपली पगारवाढ झाली? SIP गुंतवणूक करावी की गृहकर्ज फेडावे? काय करणे योग्य? जाणून घ्या

SIP vs Home Loan : आपल्याला माहिती असते की वर्षातून दोन वेळेस आपल्याला पगारवाढ मिळत असते. अशावेळी आपण घेतलेला कर्जाची परतफेड करावी किंवा अन्य ठिकाणी गुंतवणूक करावी? असा विचार आपल्या मनामध्ये येत असतो. अशावेळी मित्रांनो आपण या लेखांमध्ये आपण कोणता पर्याय निवडावा या संबंधित माहिती बघणार आहोत.

तुमच्यासाठी जास्त फायदा कुठे?

सद्यस्थितीमध्ये खाजगी किंवा सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ झालेली आपल्याला आढळून आलेली आहे अशा वेळेस आपल्या पगारातील उत्पन्नाच्या गुंतवणुकी संदर्भात बहुतांश लोक संभ्रमात असतात अशावेळी कर्जाचे प्री पेमेंट करावे ही SIP मध्ये गुंतवणूक करावी याविषयी चर्चा मनात चालू असते.

जर आपला पगार वाढला असेल तर आपण SIP मध्ये गुंतवणूक वाढवणे अधिक फायदेशीर ठरेल, असे अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे.आपली SIP मधील गुंतवणूक शेअर बाजारात गुंतवली जाते.

दीर्घ मुदतीत तुम्हाला यावर मिळणारा परतावा हा गृहकर्जावरील व्याजदरापेक्षा खूप जास्त असतो.थोडक्यात आपण जर प्रथम गृहकर्जाची परतफेड करण्याचा पर्याय निवडला तर आपले नुकसान होईल.

गृहकर्ज मुदतपूर्व फेडल्यास काय तोटा होईल?

सध्या बहुतांश कर्जदार ९ % दराने Home loan EMI भरत आहेत. SIP द्वारे म्युच्युअल फंडाच्या नियमित योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास सरासरी १२ टक्क्यांपर्यंत रिटर्न मिळत आहे.जर दीर्घ मुदतीसाठी थेट योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास सरासरी १३.५% परतावा मिळतताना दिसत आहे.

हे पण वाचा ~  Retirement Planning : आतापासूनच करा सेवानिवृत्ती नंतरची आर्थिक प्लॅनिंग! नोकरदारांसाठी तीन सर्वोत्तम पर्याय, जाणून घ्या सविस्तर

गृहकर्ज लवकर फेडण्यापेक्षा म्युच्युअल फंडात जास्त परतावा मिळेल. म्हणूनच SIP मधील गुंतवणूक वाढवल्याने तुम्हाला फायदा होईल, तर गृहकर्जाची आधी परतफेड केल्यास नुकसान होईल.

व्याज दर जास्त देणाऱ्या कर्जदारांनी काय करावे?

गृहकर्जाव्यतिरिक्त कोणतेही personal loan घेतले असेल ज्याचा व्याजदर खूप जास्त असतो, अशा वेळी कर्जदारांनी काय करावे? असा प्रश्न अनेकांच्या मनात येत असेल. वैयक्तिक कर्ज कालावधी गृहकर्जापेक्षा कमी असतो. 

आपल्याला जास्त व्याज भरावे लागते म्हणून या परिस्थितीत आपल्याला आपल्या पर्सनल लोन हप्त्यांचे ओझे कमी करायचे असेल, तर आपण अगोदर bank loan भरून दर महिन्याला EMI च्या त्रासातून मुक्त होऊ शकता.

Disclaimer : कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करा.

1 thought on “SIP vs Home Loan || आपली पगारवाढ झाली? SIP गुंतवणूक करावी की गृहकर्ज फेडावे? काय करणे योग्य? जाणून घ्या”

Leave a Comment