Close Visit Mhshetkari

DA Allowance Arrears : 18 महिने थकित महागाई भत्त्या संदर्भात महत्त्वाची अपडेट्स समोर! पहा कधी मिळणार

DA Allowance Arrears : महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी तसेच केंद्रातील सरकारी कर्मचाऱ्यांना मागील कोरोना काळात 18 महिन्याचे डीए थकबाकी मिळणे अजून बाकी आहे.सरकारने सुमारे 47 लाख केंद्र सरकारी कर्मचारी आणि 62 लाख पेन्शन धारकांना निराशा पदरी पडली होती. सरकारी कर्मचाऱ्यांचे 3400 कोटी रुपये मिळाल्यासाठी पुन्हा एकदा संघटनेकडून प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.

महागाई भत्ता फरक मिळणार

‘नॅशनल जॉइंट कौन्सिल ऑफ ॲक्शन’ (NJCA) चे वरिष्ठ सदस्य आणि ऑल इंडिया डिफेन्स एम्प्लॉईज फेडरेशनचे (AIDEF) सरचिटणीस सी. श्रीकुमार म्हणाले,जुनी पेन्शन पुनर्संचयित करण्याच्या मागणीसह,आता 18 महिन्यांचा DA/DR कोरोनामध्ये रोखण्यात आला आहे. कालावधी रु.च्या पेमेंटसाठी देखील लढा देण्यात येणार आहे.

‘स्टाफ साइड’ नॅशनल कौन्सिल (JCM) द्वारे कॅबिनेट सचिवांना सरकारी कर्मचाऱ्यांचा थकीत असलेला 18 महिन्याचा महागाई भत्ता फरक त्याचबरोबर इतर राज्यांमध्ये लागू करण्यात आलेली जुनी पेन्शन योजना सुद्धा सरकारी कर्मचाऱ्यांना लागू करण्यात यावी, यासंदर्भात निवेदन देऊन बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे आणि यामधून लवकरच सकारात्मक निर्णय निघण्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे. 

Old pension and DA arrears

सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागे भत्त्याच्या फरकासंदर्भात किंवा थकीत रकमे संदर्भात अधिवेशनामध्ये सुद्धा चर्चा झालेली होती. यावेळी अर्थराज्यमंत्री यांनी कबूल केले होते की सरकारी कर्मचाऱ्यांच्या थकीत महागाई भत्ता संदर्भात विविध संघटना आणि कर्मचाऱ्यांकडून अर्ज प्राप्त झालेले आहेत परंतु यावरती अजून सुद्धा निर्णय घेण्यात आलेला नाही. 

हे पण वाचा ~  7th Pay DA hike : मोठी बातमी सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता मध्ये होणार 4 % वाढ ? सोबतच घरभाडे भत्ता सुद्धा वाढणार ....

आता लोकसभेच्या निवडणुका एक वर्षापेक्षा कमी कालावधी राहिला असल्याने संबंधित मागणी लवकरच मान्य होणार असून जुन्या पेन्शन संदर्भात सुद्धा सरकारने अभ्यास गट स्थापन केलेला आहे आणि नवीन पेन्शन योजनेमध्ये म्हणजेच एम पी एस मध्ये जुन्या पेन्शन योजनांचा लाभ देण्यासंदर्भात सरकार विचाराधीन असल्याचं बोललं जात आहे.

लवकरच यास अभ्यास समितीचा सुद्धा अहवाल केंद्रीय मंत्रिमंडळात ठेवल्या जाणार आहे म्हणजेच सरकारी कर्मचाऱ्यांना कुठे गिफ्ट मिळण्याची शक्यता निर्माण आहे.

Central employees updates

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्तेच्या संदर्भात एक बातमी आलेली आहे ज्यामध्ये महागाई भत्ता निर्देशांक च्या अनुषंगाने कर्मचाऱ्यांच्या डीए मध्ये आणखी चार टक्के वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

जुलैपासून हा महागाई भत्ता सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे म्हणजेच आता सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागायला त्यात 42% वरून 46% पर्यंत वाढ होणार आहे आणि नक्कीच त्यापासून महागाई पासून कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

This article written by Swati Ghuge form Maharashtra.She is famous Youtuber, website developer and Editor of MahEmployees.com

Leave a Comment