Close Visit Mhshetkari

State employees : खुशखबर …. जुनी पेन्शन योजना, ग्रॅज्युटी रक्कम, सेवानिवृत्ती 60 वर्ष, आश्वासित प्रगती योजना संदर्भात सरकार घेणार लवकरच मोठा निर्णय

State employees : नमस्कार मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि खात्रीलायक माहिती समोर आलेली आहे. राजपात्रित अधिकारी व कर्मचारी संघटनेचे सदस्य व सचिव यांच्यासोबत एक बैठक पार पडलेली आहे यामध्ये जुनी पेन्शन योजना वय वर्ष साठ निवृत्ती विषयक माहिती याशिवाय इतर महत्त्वाच्या मुद्द्यांचा समावेश करण्यात आलेला आहे.

Old pension scheme update

मित्रांनो आपल्याला माहिती असेल की सरकारी कर्मचाऱ्यांनी 11 नोव्हेंबर रोजी जुन्या पेन्शन योजनेसाठी आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे.मार्च महिन्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शन साठी आंदोलन केले होते.

सरकारने जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात एक समिती स्थापन केलेली होती. त्या समितीचा कालावधी लोटला गेला असला,तरी तिचा अहवाल मात्र अजून सरकारकडे देण्यात आलेला नाही. त्यामुळे कर्मचाऱ्यांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये मोठी नाराजी दिसून येत आहे.

Employees Retirement age

राज्य सरकारी कर्मचारी व राजपत्र सहकारी कर्मचारी यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्य सचिव व राजपात्रित अधिकारी यांच्या संघटनेचे अध्यक्ष कुलथे यांच्यामध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे. त्यामध्ये खालील बाबींवर चर्चा करण्यात आलेली आहे.

हे पण वाचा ~  State employees : खुशखबर.. कर्मचाऱ्यांचे पगार होणार वेळेवर! सरकारने आणली नवीन प्रणाली;परिपत्रक निर्गमित..

सरकारी कर्मचाऱ्यांच्या जुनी पेन्शन योजना आश्वासित प्रगती योजना त्याचबरोबर मुख्यालय आणि सेवानिवृत्ती साठ वर्ष यासंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आलेली आहे.

मुख्य सचिव महोदय यांनी जुन्या पेन्शन योजने संदर्भात तयार करण्यात आलेल्या,अभ्यास समितीचा अहवाल 20 नोव्हेंबर 2023 पर्यंत सरकार दरबारी जमा करण्यात येईल अशी ग्वाही दिलेली आहे.

आश्र्वासित प्रगती योजना, ग्रॅच्युइटी

सोबतच राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करणे आणि ग्रॅच्युइटीची रक्कम वीस लाख रुपये करणे यावर सध्या प्रक्रिया सुरू असून याबाबत लवकरच निर्णय होईल असे मुख्य सचिवांनी यावेळी नमूद केले आहे.

केंद्राप्रमाणे प्रगती योजनेत ५ हजार ४०० रुपयांची ग्रेड पे मर्यादा रद्द करण्याची मागणीही मान्य करण्याचे आश्वासन मुख्य सचिवांनी दिले आहे. आता या प्रलंबित मागण्या केव्हा पूर्ण होतात याकडेच कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून राहणार आहे.

Leave a Comment