Income Tax Refund : आयकर परताव्याचे पैसे अद्याप मिळालेले नाहीत ? कारण काय आणि परतावा कधी मिळणार; पहा कसे तपासावे ?

Income Tax Refund : आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबर आहे. आतापर्यंत अनेक करदात्यांनी आयटीआर दाखल केला आहे. कर भरल्यानंतर, करदाते आतुरतेने परताव्याची वाट पाहत असतात. तुम्हालाही अद्याप आयकर परतावा (ITR refund status Check) मिळाला नसेल, तर या लेखात दिलेल्या प्रक्रियेचे अनुसरण करून तुम्ही स्थिती तपासू शकता.

ITR refund status Check Process

आयटीआर भरण्याची अंतिम तारीख जवळ येत आहे. या वर्षी आयकर विभागाने आयटीआर भरण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबर निश्चित केली आहे. आतापर्यंत अनेक करदात्यांनी आयटीआर दाखल केला आहे.

आयटीआर दाखल केल्यानंतर करदाते परताव्याची वाट पाहतात. तुम्हीही परताव्याच्या प्रतीक्षेत असाल, तर खाली दिलेल्या स्टेप्स (ITR refund status Check Process) फॉलो करून परताव्याचे पैसे कधी मिळतील हे सहज जाणून घेऊ शकता.

इन्कम टॅक्स रिटर्न स्टेटस कसे तपासावे?

आयटीआर दाखल केल्यानंतर परताव्याचे पैसे कधी मिळतील हे जाणून घ्यायचे असल्यास, खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही स्टेटस तपासू शकता.

  • स्टेप १- सर्वप्रथम तुम्हाला आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
  • स्टेप २- आता येथे तुम्हाला यूजर आयडी आणि पासवर्डने लॉगिन करावे लागेल.
  • स्टेप ३- आता तुम्हाला ‘ई-फाइल’ पर्यायातील ‘Income Tax Return’ या पर्यायावर यावे लागेल.येथे तुम्हाला ‘View Filed Return’ या पर्यायावर क्लिक करावे लागेल.
  • स्टेप ४- आता येथे तुम्ही सहजपणे परताव्याची स्थिती जाणून घेऊ शकता.
हे पण वाचा ~  Income Tax कसा वाचवाल? आई-वडिलांसोबत राहत असाल तरी घेता येतो HRA चा लाभ ....

परतावा का मिळाला नाही ?

आयकर विभागाच्या अधिकृत वेबसाइटनुसार, जर तुम्ही पॅन कार्ड आधारशी लिंक केले नसेल, तरीही तुमचा परतावा अडकू शकतो.

जर बँक खात्याचा तपशील चुकीचा भरला गेला असेल.

जर तुमच्या बँक खात्यात दिलेले नाव आणि पॅन कार्डवर दिलेले नाव वेगळे असेल.

पॅन कार्ड आधारशी कसे लिंक करावे ?

  • पॅन कार्डला आधार कार्डशी लिंक करण्यासाठी आयकर ई-फायलिंगच्या वेबसाइटवर जावे लागेल.
  • स्टेप १- सर्वप्रथम टॅक्स ई-फायलिंग वेबसाइटवर जा.
  • स्टेप २- येथे तुम्हाला ‘Link Aadhaar’ चा पर्याय मिळेल, त्यावर क्लिक करा.
  • स्टेप ३- आता तुम्हाला पॅन आणि आधार दोन्हीचे क्रमांक विचारले जातील, ते प्रविष्ट करा.
  • स्टेप ४- यानंतर, जो मोबाईल नंबर तुम्ही दोन्हीसाठी नोंदणी करताना दिला आहे, तो प्रविष्ट करा.
  • स्टेप ५- नंतर ‘I agree to validate my Aadhaar details with UIDAI’ वर ओके करा.
  • स्टेप ६- शेवटी तुमच्या स्क्रीनवर ‘Pan Has Been Linked Successfully’ असा मेसेज येईल.

अशा प्रकारे तुम्ही सोप्या स्टेप्समध्ये आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक करू शकता.

Leave a Comment