Close Visit Mhshetkari

Bank FD Interest Rate : बँक एफडी नवीन व्याजदर जाहीर! पहा कोणती बँक मुदत ठेवींवर सर्वाधिक व्याजदर ?

Bank FD Interest Rate : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती आहे की सद्यस्थितीमध्ये सुरक्षित गुंतवणेकडे सर्व नागरिकांचा कल वाढत चाललेला आहे. 2024 सालासाठी महाराष्ट्रातील त्याचबरोबर देशातील सुरक्षित बँका त्याचबरोबर वाढीव व्याजदरांसाठी कोणती बँक चांगली आहे.या संदर्भात सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये बघणार आहोत.

मित्रांनो आपल्याला माहिती असेल की विविध बँका त्याचबरोबर कार्यकाळानुसार व्याजदर वेगवेगळे असतात.अशावेळी देशातील महत्त्वाच्या बँकांमधील बँक एफ डी सी अलीकडील व्याजदर काय आहेत? हे आज आपण जाणून घेणार आहोत.

Top 5 Bank FD List 2024

SBI FD Rates :- स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) सामान्य ग्राहकांना सात दिवस ते दहा वर्षांच्या कालावधीत परिपक्व होणाऱ्या ठेवींवर 3.5 ते 7% आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 4% ते 7.5% पर्यंत व्याजदर ऑफर करते. हे दर 27 डिसेंबर 2023 पासून लागू आहेत

Axis Bank FD Rate : – ॲक्सिस बँक सात दिवस ते दहा वर्षांच्या मुदतीच्या ठेवींवर सामान्य लोकांना 3.50-7.10% वार्षिक एफडी दर ऑफर करते.दर 26 डिसेंबर 2023 पासून प्रभावी आहेत. Axis बँक ज्येष्ठ नागरिकांना 3.50-7.75% वार्षिक FD दर ऑफर करते.

HDFC Bank FD Rate :- एचडीएफसी बँक 7 दिवस ते 10 वर्षांच्या कालावधीत परिपक्व होणाऱ्या ठेवींवर सामान्य ग्राहकांना 3% ते 7.20% पर्यंत व्याजदर ऑफर करते. या ठेवींवर ज्येष्ठ नागरिकांना 3.5% ते 7.75% दराने व्याज मिळेल. हे दर 1 ऑक्टोबर 2023 पासून लागू आहेत.

हे पण वाचा ~  PPF Account : आपण बॅंक FD आणि RD प्रमाणे एकापेक्षा जास्त PPF खाते उघडू शकता? जाणून घ्या नियम

ICICI Bank FD Rates :- ICICI बँक सामान्य ग्राहकांना 7 दिवस ते 10 वर्षात परिपक्व होणाऱ्या FD वर 3% ते 7.1% आणि ज्येष्ठ नागरिकांना 3.5% ते 7.65% पर्यंत व्याजदर देत आहे.सदरील दर 16 ऑक्टोबर 2023 पासून लागू आहेत.

बँक ऑफ बडोदा :- BoB मध्ये नवीन FD दर

बँक ऑफ बडोदा 15 जानेवारी 2024 पासून 4.25% ते 7.25% पर्यंत व्याजदर ऑफर करते आहे.

पंजाब नॅशनल बँक :- PNB मध्ये नवीन FD दर

PNB सामान्य नागरिकांना 7 दिवस ते 10 वर्षांच्या कालावधीत परिपक्व होणाऱ्या ठेवींवर 3.5% ते 7.25% दर देते. बँक सात दिवस ते दहा वर्षात परिपक्व होणाऱ्या FD वर 4% ते 7.75% आणि सुपर सिनियर्सना 4.3% ते 8.05% पर्यंत व्याजदर देते. हे दर 8 जानेवारी 2024 पासून लागू आहेत.

कोटक महिंद्रा बँक : – कोटक महिंद्रा बँक 4 जानेवारी 2024 पासून सामान्य नागरिकांसाठी 2.75% ते 7.25% आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 3.25% ते 7.80% व्याजदर देते.

This article has been written by Raj Kakad from Maharashtra.He is a famous Marathi Blogger, Website Developer and Administrator of MahEmployees.com

Leave a Comment