State Bord Exam : इयत्ता दहावी – बारावीच्या विद्यार्थ्यांनो लागा तयारीला! बोर्डाच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर …

State Bord Exam : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे,तर्फे दहावी बारावीच्या परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे.विद्यार्थ्यांवर परीक्षा काळात ताण येऊ नये म्हणून महामंडळातर्फे हा निर्णय घेण्यात आला आहे.

State Bord Exam Results

राज्य मंडळाने जुलै-ऑगस्टमध्ये घेतलेल्या दहावी-बारावीची पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी, सचिव अनुराधा ओक यांनी निकालाची माहिती दिली.

बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या 70 हजार 205 विद्यार्थ्यांपैकी 68 हजार 909 विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली. यापैकी 22 हजार 144 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.परिक्षेत खालील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

  • विज्ञान शाखेतील 14 हजार 632,
  • कला शाखेतील 4 हजार 146,
  • वाणिज्य शाखेतील 3 हजार 28,
  • व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या 286
  • आयटीआयच्या 52

दहावीच्या पुरवणी परीक्षेसाठी बसलेलल्या 49 हजार 377 विद्यार्थ्यांपैकी 45 हजार 166 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.त्यापैकी 13 हजार 487 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

राज्य मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. त्यात बारावीचा निकाल 32.13 %, तर दहावीचा निकाल 29.86 % लागला आहे.

हे पण वाचा ~  10th 12th HSC SSC Maharashtra Board time table 2024 || 10 वी 12 वी बोर्ड परीक्षा चे टाईम टेबल जाहीर! लगेच करा डाऊनलोड

Maharashtra state board exam date

राज्य मंडळाच्य प्रसिद्धिपत्रकाद्वारे बोर्ड परिक्षेच्या वेळापत्रका संदर्भात माहिती दिली आहे.दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा परीक्षेच्या काळातील ताण कमी करण्यासाठी संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले.साहजिकच या वेळापत्रकामुळे विद्यार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे.

विद्यार्थ्यांसाठी परीक्षांचे संभाव्य सविस्तर वेळापत्रक हे http://www.mahasscboard.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. या वेळापत्रकाबाबत काही हरकती-सूचना असल्यास त्या 15 दिवसांत विभागीय मंडळ, राज्य मंडळाकडे लेखी स्वरुपात सादर करण्याच्या देखील सूचना करण्यात आल्या आहेत.

दहावी आणि बारावीच्या परीक्षा या प्रचलित पद्धतीनेच होणार आहे.बोर्ड परिक्षा संभाव्य वेळापत्रक केवळ विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी आहे. दहावी बारावी बोर्ड परीक्षेपूर्वी शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांकडे देण्यात येणारे छापील वेळापत्रक अंतिम असणार आहे.

प्रात्यक्षिक, तोंडी, श्रेणी परीक्षांचे वेळापत्रक स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार असल्याचेही बोर्डाकरुन स्पष्ट करण्यात आले आहे.

👉दहावी बारावी परीक्षा वेळापत्रक येथे पहा👈

Leave a Comment