Retirement age : मीडिया रिपोर्ट नुसार,राज्याच्या मुख्य सचिवांनी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्त वय 58 वरुन 60 वर्ष करण्यासंदर्भात प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर पाठवलेला आहे.
महाराष्ट्र राज्य सरकार अनुकूल
लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकारी कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी शिंदे – पवार – फडणवीस सरकार निश्चितच हा निर्णय घेऊ शकते असे काही तज्ञांनी व्यक्त केले आहे.
राज्य सरकारकडून शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्ती वय 60 वर्षे करण्याच्या मागणीवर लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याची शक्यता वर्तविली जाते आहे.यामुळे राज्य शासन याबाबतचा शासन निर्णय केव्हा काढते? यावर सकारात्मक निर्णय केव्हा घेते? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
पेन्शन व ग्रॅच्युटी रक्कम वाचणार
सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना 14 लाख रुपयापर्यंत ग्रॅच्युटी रक्कम द्यावी लागतो.परिणामी 60 हजार कर्मचारी वर्गास सरकारला दरवर्षी 3 हजार 600 कोटी रुपयांचा बोजा पडतो.तसेच लगेच पेन्शन सुरू करावे लागते.सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष केल्यास राज्य सरकारचे दरवर्षी जवळपास 4 हजार कोटी रुपये वाचणार आहे.
सेवानिवृत्त वय 60 वर्षे आवश्यकता
- अतिरिक्त कार्यभाराच्या तणावाने शेकडो कार्यक्षम सरकारी अधिकारी स्वेच्छानिवृत्ती घेत आहेत.
- राज्यातील दर वर्षी 3 % म्हणजेच जवळपास पंचवीस ते तीस हजार कर्मचारी निवृत होतात, अशावेळी रिक्त पदांची वाढ तातडीने थांबवणे गरजेचे आहे.
- शासकीय सेवेतील अकार्यक्षम आणि संशयातीत सचोटी या कारणास्तव शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची वय वर्षे 50 आणि 55 वयाच्या कालावधीत सेवा पुनर्विलोकन करून त्यांना सक्तीने सेवानिवृत्ती देण्यात येते.
- कर्मचाऱ्यांलाच नोकरी करण्याची इच्छा नसेल, अशांना स्वेच्छानिवृत्तीचा पर्याय खुला असतो.
सरकारी कर्मचारी पगारवाढ, महागाई भत्ता, जुनी पेन्शन संदर्भात अपडेट्स साठी आमचा व्हाट्सऍप गृप जॉईन करा