Close Visit Mhshetkari

Education policy : दहावी-बारावीसाठी आता सेमिस्टर पॅटर्न! पहा कसे असणार परीक्षेचे स्वरूप आणि केव्हा होणार अंमलबजावणी…

Education policy : नमस्कार मित्रांनो इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी समोर आलेली असून आता सरकारने दहावी बारावीच्या परीक्षांमध्ये बदल करण्याचा निर्णय जाहीर केल्याचे समोर येत आहे.

New education policy

मित्रांनो इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा पद्धतीत बदल करताना आता सेमिस्टर पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे ज्याद्वारे वर्षातून दोनदा परीक्षा होतील. दिवाळीपूर्वी एक सत्र आणि मार्चमध्ये दुसरे व अंतिम सत्र होईल. 

नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार या बदलाची अंमलबजावणी आगामी २०२४-२५ किंवा २०२५-२६च्या शैक्षणिक वर्षापासून होऊ शकते,अशी माहिती पुणे बोर्डातील वरिष्ठ सूत्रांनी दिली.

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने बोर्ड परीक्षा संदर्भात तसेच अभ्यासक्रमासह इतर दहा मुद्द्यांवरती पालक शिक्षक व सर्वसामान्य जनतेकडून सूचना मागवल्या होत्या. 

  • ज्यामध्ये बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांची खरी क्षमता तपासता येत नाही का?
  • बोर्डाच्या परीक्षा घेण्याच्या सध्याच्या पद्धतीत बदल काही करण्याची गरज आहे का? 
  • बोर्डाच्या परीक्षेची जी पद्धत सुरू आहे ती तशीच राहू द्यावी की बदलावी,असे तुम्हाला वाटते का? 

विद्यार्थ्यांच्या पाठांतराची सवय कमी करण्यासाठी अभ्यासक्रमात पुस्तकांचा मजकूर कमी करून मनोरंजक बनवण्यात येणार आहे.त्याचबरोबर पुस्तकांच्या आशयाची सांगड घातली जाणार असून विद्यार्थ्यांसाठी वैचारिक क्षमतेचा विकास होण्यासाठी अभ्यासक्रमा त बदल करण्यात येणार आहे.

हे पण वाचा ~  Education news : मोठी बातमी ... महाराष्ट्रातील ' या ' विद्यार्थ्यांसाठी ४१ तालुक्यांच्या ठिकाणी ८२ शासकीय वसतिगृहाची स्थापना! पहा संपूर्ण यादी ...

नवीन बदल असा असणार… 

सदरील परीक्षा परिषदेमध्ये शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक विरोधात त्यांना नेहमीप्रमाणेच अध्यापन करावे लागणार असून जसे पदवी त्याचा पदवी तर परीक्षा साठी सेमिस्टर पद्धत असते त्याचा अवलंब आता दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा पद्धतीत करण्यात येणार आहे. पहिले सत्र दिवाळीपूर्वी घेले जाणार असून पुढील सत्र मार्च महिन्यात होईल. 

या सोबतच विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा पार पडेल.शेवटी दोन्ही सत्र परीक्षांचे गुण एकत्रित करून बोर्डाच्या माध्यमातून निकाल प्रसिद्ध केला जाणार आहे. 

सेमिस्टर पॅटर्नचा हेतू

सदरील परीक्षा पद्धतीचा फायदा म्हणजे विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार असून ताण कमी होण्यास मदत होणार आहे. त्याबरोबर एका सत्रात कमी गुण मिळाल्यास दुसऱ्या सत्रात त्याचा चांगला अभ्यास करून अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील सहा महिन्यात पुन्हा संधी मिळणार आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाणार नाही.

This article written by Swati Ghuge form Maharashtra.She is famous Youtuber, website developer and Editor of MahEmployees.com

Leave a Comment