SIP Investment : अनेक जण म्युच्युअल फंडात (Mutual Fund) एसआयपीद्वारे (SIP Investment) गुंतवणूक करतात. एसआयपीच्या माध्यमातून ठराविक कालावधीमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळण्याची शक्यता.
एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक केल्यास गुंतवणूक करणे सोपे जोखीम कमी आणि चांगला परवा मिळत असल्याने लोक एसआयपी इन्वेस्टमेंट करत. म्युच्युअल फंडात SIP द्वारे गुंतवणूक करून सर्वाधिक परतावा कसा मिळवायचा याबाबत सविस्तर वाचा.
SIP Investment tips
दरमहा गुंतवणूक : sip मध्ये गुंतवणूक करण्याची करण्याचा सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे आपण यामध्ये ठराविक रक्कम प्रत्येक महिन्यात गुंतवू शकतो आणि त्याद्वारे आपल्याला जास्तीत जास्त परतावा मिळणार मिळण्यासाठी पर्याय उपलब्ध असतात
लवकरच गुंतवणूक : एसआयपी द्वारे जास्तीत जास्त परतावा मिळण्यासाठी आपण दीर्घकाल गुंतवणूक करावी त्यासाठी लवकरात लवकर एसआयपी मध्ये गुंतवणूक करणे आवश्यक असते.तुम्ही खूप पैसे गुंतवलेच पाहिजे असे नाही, तुम्ही फक्त 500 रुपयांपासून एसआयपी सुरू करू शकता.
नियमितपणे गुंतवणूक : एस आय पी मध्ये गुंतवणूक करण्याची आणखी महत्त्वाची टिप्स म्हणजे यामध्ये नियमित गुंतवणूक करावी अगदी पाचशे रुपयांपासून आपण दरमहा सुद्धा यामध्ये टाकू शकता ज्याद्वारे ठराविक कालावधीनंतर जास्त नफा आपल्याला मिळत असतो. बाजारातील मंदीच्या भीतीने तुम्ही तुमची SIP मधील गुंतवणूक थांबवू नये.
SIP गुंतवणुकीची रक्कम : आपले उत्पन्न वाढत असताना, तुमच्या SIP रक्कम वाढवने फायदेशीर असते . तुम्ही SIP मधील गुंतवणुकीची रक्कम हळूहळू वाढवा, यामुळे तुम्हाला अधिक परतावा मिळण्यात मदत होईल.
पोर्टफोलिओमध्ये विविधता : म्युच्युअल फंड किंवा रेसिपी मध्ये गुंतवणूक करताना कधीच एकाच ठिकाणी गुंतवणूक करू नका वेगवेगळ्या म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक केल्यास धोका कमी असतो. जेणेकरून आपले नुकसान होणार नाही पोर्टफोलिओमध्ये विविधता आणण्यासाठी इक्विटी,सोने,म्युच्युअल फंड आणि इतर फंड यासारख्या विविध ठिकाणी गुंतवणूक करणं गरजेचं आहे. यामुळे एखाद्या क्षेत्रात मंदी आली तरी तुमचं जास्त नुकसान होणार नाही.
योग्य फंड : अधिक परतावा मिळण्यासाठी योग्य मुच्युअल फंडाची निवड करणे फार महत्त्वाचे असते तुमच्या गुंतवणुकीच्या उद्दिष्टना अनुकूल असलेले म्युचल फंड निवडून त्यामध्ये गुंतवणूक करा त्यामध्ये स्मॉल कॅप आणि लार्ज कॅप, मलटी कॅप्स अशा म्युच्युअल फंड निवडून त्यामध्ये गुंतवणूक करा.
Disclaimer :- सदरील लेख फक्त शैक्षणिक माहितीसाठी देण्यात आलेला आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखीमपूर्ण आहे. शेअर बाजारात व्यवहार करण्यापूर्वी आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्यावा. तुमच्या आर्थिक नुकसानीला महा एम्प्लॉईज जबाबदार राहणार नाही.