Close Visit Mhshetkari

State employees : सरकारी कर्मचाऱ्यांची मुख्यालय राहण्या संदर्भात अट शिथिल होणार- मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे

State employees : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेले असून खालील कर्मचाऱ्यांच्या अनेक दिवसांपासून मागणी असलेली मुख्यालयाची अट लवकर शिथिल करण्याचा निर्णय निर्गमित करण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिलेले आहे तर बघूया सविस्तर माहिती

State employees updates

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वेबसाईटचे, यूट्यूब चॅनल, सोशल मीडिया खात्यांचे उद्‌घाटन करण्यात आले होते, प्रसंगी शिक्षण आयुक्त मा.सूरज मांढरे बैठकीस उपस्थित होते.

शिक्षकांना मुख्यालयी राहण्याची अट शिथिल करण्याचा आदेश तातडीने काढण्यात येईल,तसेच MSCIT उत्तीर्ण होण्यासाठी २०२१ पर्यंत मुदतवाढ देण्यासंदर्भात काही दिवसांत शासन निर्णय निर्गमित करण्याचे आणि शिक्षकांचे विविध प्रश्न सोडविण्यात येतील असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.

हे पण वाचा ~  Family pension : सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतन संदर्भात सरकारने घेतला मोठा निर्णय ! आता महिला कर्मचारी .....

सरकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्या होणार पुर्ण

  • शिक्षकांना मुख्यालयी राहण्याची अट रद्द करावी.
  • वैद्यकीय उपचारासाठी कॅशलेस सुविधा उपलब्ध करावी.
  • स्थानिक स्वराज्य संस्था कर्मचार्‍यांप्रमाणे शिक्षकांना 10,20,30 वर्षांची आश्वासित प्रगती योजना लागू करावी.
  • उच्च शैक्षणिक अहर्ता प्राप्त शिक्षकांना पदोन्नती द्यावी.
  • मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा आणि सरळसेवेसाठी पात्र होण्यासाठी जिल्हा परिषदा,जिल्हा सेवा प्रवेश नियम 1967 च्या सेवा प्रवेश नियमात सुधारणा करावी.

This article written by Swati Ghuge form Maharashtra.She is famous Youtuber, website developer and Editor of MahEmployees.com

1 thought on “State employees : सरकारी कर्मचाऱ्यांची मुख्यालय राहण्या संदर्भात अट शिथिल होणार- मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे”

  1. मुख्यालय राहणं ही अट कशासाठी पाहिजे… वास्तविक त्याचे कोणतेही बंधन नको.सर्व शिक्षक कर्मचारी अगदी वेळेच्या दप्तरी दाखल होतात मग कशासाठी हा अट्टाहास पाहिजे.कोणीतरी एखादा कर्मचारी चुकतो म्हणजे ती शिक्षा सर्वांना नको.शिक्षकांना पूर्ण स्वातंत्र्य द्या म्हणजे शिक्षक आनंदात त्याचं कर्तव्य पूर्ण करण्यासाठी नेहमी सज्ज राहील.

    Reply

Leave a Comment