Close Visit Mhshetkari

Public Holiday : मोठी बातमी ! राज्य सरकारकडून सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर ! पहा कोणत्या दिवशी असणार सुट्टी…

Public Holiday : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती असेल की सरकार दरवर्षी पब्लिक हॉलिडेज म्हणजे शासकीय सुट्ट्या जाहीर करत असते.शासन परिपत्रकानुसार सर्व शासकीय कार्यालयांना या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते.2024 मध्ये कोणकोणत्या सणांना राष्ट्रीय सुट्टे आहेत, याविषयी सविस्तर माहिती आपण या लेखामध्ये पाहणार आहोत.

भारत सरकारच्या गृह मंत्रालयाची अधिसूचना क्रमांक ३९/१/६८- जेयुडीएल/तीन, दिनांक ८ मे १९६८ अन्वये महाराष्ट्र शासनाकडे सोपविण्यात आले आहेत. सदरील अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन या अधिसूचनेद्वारे महाराष्ट्र राज्यात सन २०२४ सालासाठी खाली नमूद केलेले दिवस सार्वजनिक सुट्टया म्हणून जाहीर करण्यात आल्या आहे.

Public Holiday list 2024

  1. प्रजासत्ताक दिन २६ जानेवारी २०२४ ०६ माघ, शके १९४५ ,शुक्रवार
  2. छत्रपती शिवाजी महाराज जयंती,१९ फेब्रुवारी २०२४
  3. ३० माघ, शके १९४५ ,सोमवार
  4. महाशिवरात्री ०८ मार्च २०२४ ,१८ फाल्गुन, शके १९४५
  5. शुक्रवार
  6. होळी (दुसरा दिवस) २५ मार्च २०२४ ०५ चैत्र, शके १९४६,सोमवार
  7. गुड फ्रायडे – २९ मार्च २०२४,०९ चैत्र, शके १९४६ ,शुक्रवार
  8. गुढीपाडवा – ०९ एप्रिल २०२४,२० चैत्र, शके १९४६,मंगळवार
  9. रमझान ईद (ईद-उल-फितर) (शव्वल १) – ११ एप्रिल २०२४ ,२२ चैत्र, शके १९४६,गुरुवार
  10. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती – १४ एप्रिल २०२४,२५ चैत्र, शके १९४६ ,रविवार
  11. रामनवमी – १७ एप्रिल २०२४,२८ चैत्र, शके १९४६,बुधवार
  12. महावीर जन्म कल्याणक – २१ एप्रिल २०२४,०१ वैशाख, शके १९४६,रविवार
  13. महाराष्ट्र दिन – ०१ मे २०२४,११ वैशाख, शके १९४६,बुधवार
  14. बुध्द पौर्णिमा – २३ मे २०२४,०२ ज्येष्ठ, शके १९४६ ,गुरुवार
  15. बकरी ईद (ईद-उल-झुआ) – १७ जून २०२४,२७ ज्येष्ठ, शके १९४६,सोमवार
  16. मोहरम – १७ जुलै२०२४ , २६ आषाढ, शके १९४६,बुधवार
  17. स्वातंत्र्य दिन – १५ ऑगस्ट २०२४ ,२४ श्रावण, शके १९४६,गुरुवार
  18. पारशी नववर्ष दिन (शहेनशाही) – १५ ऑगस्ट २०२४,२४ श्रावण, शके १९४६,गुरुवार
  19. गणेश चतुर्थी – ०७ सप्टेंबर २०२४,१६ भाद्रपद, शके १९४६,शनिवार
  20. ईद-ए-मिलाद – १६ सप्टेंबर२०२४,२५ भाद्रपद, शके १९४६ ,सोमवार
  21. महात्मा गांधी जयंती – ०२ ऑक्टोबर २०२४ ,१० आश्विन, शके १९४६ ,बुधवार
  22. दसरा – १२ ऑक्टोबर २०२४,२० आश्विन, शके १९४६ ,शनिवार
  23. दिवाळी अमावस्या (लक्ष्मीपूजन) – ०१ नोव्हेंबर २०२४,१० कार्तिक, शके १९४६ ,शुक्रवार
  24. दिवाळी (बलिप्रतिपदा)- ०२ नोव्हेंबर २०२४,११ कार्तिक, शके १९४६,शनिवार
  25. गुरुनानक जयंती- १५ नोव्हेंबर २०२४,२४ कार्तिक, शके १९४६, शुक्रवार
  26. ख्रिसमस – २५ डिसेंबर २०२४ ,०४ पौष, शके १९४६,बुधवार
हे पण वाचा ~  Public Holiday : सप्टेंबर महिन्यात तब्बल 16 दिवस बॅंक बंद? RBI कडून सुट्ट्यांची यादी जाहीर

सोबतच मित्रांनो स्थानिक जिल्हाधिकारी यांच्या अखत्यारीतील तीन सुट्ट्या सरकारी कार्यालयासाठी जाहीर करण्यात येतात.जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यामार्फत या सुट्ट्या दरवर्षी जाहीर करण्यात येतात.

This article written by Swati Ghuge form Maharashtra.She is famous Youtuber, website developer and Editor of MahEmployees.com

Leave a Comment