8th Pay Commission : केंद्र सरकार लवकरच आठवा वेतन आयोग लागू करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
सातव्या वेतन आयोगाची मुदत २०२४ मध्ये संपत आली आहे. आगामी वर्षात आठव्या वेतन आयोगाची शिफारस केली जाण्याची शक्यता आहे. नवीन आयोगानुसार (8th Pay Commission) कर्मचाऱ्यांच्या वेतनात नेमकी किती वाढ होईल ? ‘फिटमेंट फॅक्टर’ म्हणजे काय ? याविषयी सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत.
किती पगारवाढ अपेक्षित आहे ?
आठवा वेतन आयोग लागू झाल्यास कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनात (minimum wage) मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. सध्याच्या अंदाजानुसार, फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ केल्यास कर्मचाऱ्यांचे किमान वेतन २६ हजार रुपयांपर्यंत होऊ शकते.
मित्रांनो,सातव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर (Fitment Factor) २.५७ पट करण्यात आला होता. परिणामी कर्मचाऱ्यांच्या पगारात १४.२९ टक्क्यांनी वाढ झाली आणि किमान वेतन १८ हजार रुपये झाले होते.
फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय?
फिटमेंट फॅक्टर हा सरकारी कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन (Basic Pay) निश्चित करण्यासाठी वापरला जाणारा एक महत्त्वाचा घटक आहे. नवीन वेतन आयोगाच्या शिफारशींनुसार, कर्मचाऱ्यांचे जुने मूळ वेतन आणि ग्रेड पे (Grade Pay) याला विशिष्ट फिटमेंट फॅक्टरने गुणले जाते. यामुळे त्यांचे नवीन मूळ वेतन निश्चित होते.
उदाहरणार्थ, जर तुमचा मूळ पगार १० हजार रुपये असेल आणि फिटमेंट फॅक्टर २.५७ असेल, तर नवीन मूळ वेतन २५ हजार ७०० रुपये झाले होते.”फिटमेंट फॅक्टर” पगारातील असमानता दूर करण्यासाठी आणि सर्वांना समान वेतन वृद्धी देण्यासाठी वापरला जातो.
नवीन वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर
- सहावा वेतन आयोग : फिटमेंट फॅक्टर १.८६ पट
- सातवा वेतन आयोग : फिटमेंट फॅक्टर २.५७ पट
- आठवा वेतन आयोग (अपेक्षित) : जर आठवा वेतन आयोग लागू झाला, तर फिटमेंट फॅक्टरमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे पगारात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
नवीन अंदाजानुसार,आठव्या वेतन आयोगांतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात (Basic Salary) ४० ते ५० टक्के वाढ होण्याची शक्यता आहे. सदरील वाढ फिटमेंट फॅक्टर (Fitment Factor) वर आधारित असेल, जो २.२८ ते २.८६ च्या दरम्यान राहू शकतो.