Close Visit Mhshetkari

Home Loan : गृह कर्ज धारकांसाठी आनंदाची बातमी .. केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत ! गृहकर्ज अनुदान योजना…

Home Loan : केंद्रातील मोदी सरकार घर खरेदी करणाऱ्यांसाठी एक मोठं गिफ्ट देण्याच्या तयारीत आहे. काही दिवसापूर्वी केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलेंडर मध्ये कपात केल्यानंतर, आता गृह कर्ज संदर्भात सरकार नवीन योजना आणण्याच्या तयारीत आहे.तर बघूया काय आहे योजना सविस्तर

Home Loan Subsidy Scheme

गृह कर्ज अनुदान योजनेकरतासाठी केंद्र सरकारनं 60 हजार कोटी खर्च केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या गृहकर्ज योजनेतून वार्षिक व्याज अनुदान मानस आहे. याद्वारे स्मॉल अर्बन हाऊसिंगवर अनुदानित कर्ज (Subsidy Loan) उपलब्ध करून दिले जाणार आहे.

आगामी काळात राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड यासारख्या महत्त्वाच्या पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका आहेत.शिवाय देशातील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सदरील योजना प्रत्यक्षात अमलात आणणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

हे पण वाचा ~  Home Loans : घर खरेदीसाठी पैसे खिशात असताना सुद्धा का घेतात लोक गृहकर्ज ? पहा फायद्याचे गणित

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑगस्ट महिन्यात स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी भाषाणातून गृहकर्जावरच्या अनुदानाच्या योजनेसंदर्भात भाष्य केले होते.जी मध्यम वर्गातील मंडळी घर घेण्याचं स्वप्न पाहात आहेत, त्यांच्या करता येत्या काही काळात आम्ही एक योजना राबवण्याचा विचार करत आहोत.

गृहकर्ज अनुदान योजना

गृह कर्ज व्याजदरातील दिली जाणारी सुट लाभार्थ्यांच्या बँकेच्या खात्यात वर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी कल्पना त्यावेळी पंतप्रधान मोदींनी भाषणातून दिली होती.

आगामी केंद्राच्या कॅबिनेट बैठकीत या योजनेला मंजूरी मिळण्याची शक्यता आहे.होम लोन सबसीडी स्कीम लागू झाल्यास ती 2028 पर्यंत चालू राहू राहू शकते.व्याजदरात सवलत मिळालेली रक्कम थेट बँकेच्या खात्यात वर्ग केली जाणार आहे.

गृहकर्जावर किती सबसिडी मिळणार ? येथे पहा

Home loan

Leave a Comment