Close Visit Mhshetkari

SBI Bank : स्टेट बैंक कडून 13 ते 20 लाख रुपयाचे कार लोन घेतल्यावर किती EMI द्यावा लागेल? पहा कॅल्कूलेशन …

SBI Bank : आपण कार लोन घेण्याचा विचारात आहात काय? आपल्यालाही SBI Bank Car Loan ची आवश्यकता आहे का? असे असल्यास, सर्वप्रथम आपल्याला किती लाख रुपयांचे कर्ज किती काळासाठी हवे आहे ? हे तपासावे लागेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तुमचा मासिक हप्ता किती असेल ? त्याविषयी सविस्तर माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.

SBI Bank Car Loans EMI Calculator

मित्रानो आपण एसबीआयकडून किती रकमेचे कार लोन घेणार आणि तुम्ही ते किती वर्षांसाठी परत करणार यावर आपले मासिक EMI अवलंबून आहे.सध्या,एसबीआय 8.85% ते 9.80% पर्यंत व्याजदरांवर कार कर्ज देते आहे.इलेक्ट्रिक वाहनांसाठी हे व्याज दर 8.75% ते 9.45% पर्यंत आहेत.

स्टेट बँक ऑफ इंडिया कार लोन

13 लाख रुपये वाहन कर्ज

  • कालावधी : 5 वर्ष
  • व्याज दर : 8.85%
  • मासिक EMI : ₹26,891
  • एकूण व्याज : ₹3,13,479
हे पण वाचा ~  YONO App UPI : SBI चे ग्राहक असाल तर आता ATM कार्डशिवाय पैसे काढता येणार, जाणून घ्या पद्धत

20 लाख रुपये इलेक्ट्रिक कार कर्ज

  • कालावधी : 5 वर्षांसाठी
  • व्याज दर : 8.75%
  • मासिक EMI : ₹41,274
  • एकूण व्याज : ₹4,76,468

आपण EMI काय असेल ते निश्चित करण्यासाठी एसबीआयच्या कार लोन EMI Calculator चा वापर करू शकता. https://sbi.co.in/web/student-platform/emi-calculator

सदरील आकडेवारी अंदाजे दिलेली आहे. आपली वास्तविक EMI तुमच्या क्रेडिट स्कोअर आणि इतर घटकांवर अवलंबून असू शकते.

This article written by Swati Ghuge form Maharashtra.She is famous Youtuber, website developer and Editor of MahEmployees.com

Leave a Comment