Close Visit Mhshetkari

ops committee : जुन्या पेन्शन योजने संदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित! शासन निर्णय दिनांक 27/7/2023

ops committee : सन 2005 नंतर सरकारी नोकरीमध्ये लागलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात 14 मार्च 2023 रोजी राज्यवापी आंदोलन करण्यात आले होते तर माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीनंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले होते.

जुनी पेन्शन देण्यासंदर्भात अभ्यास समिती गठीत करण्यात आली होती, या समितीची मुदत दिनांक 16 जून 2023 रोजी संपलेली होती आता या समितीत मुदतवाढ देण्यात आलेली आहे तर बघूया सविस्तर माहिती

जुनी पेन्शन योजना अभ्यास समिती

वित्त विभाग,शासन निर्णय दिनांक १४.०३.२०२३ अन्वये राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली व जुनी निवृत्तिवेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करुन दिनांक १ नोव्हेंबर, २००५ रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीअंती खात्रीशीर आर्थिक व सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजनेबाबत शिफारस / अहवाल शासनास सादर करण्यासाठी सेवानिवृत्त भा.प्र.से. अधिकारी यांची समिती गठीत करण्यात आली आहे. सदर समितीस तीन महिन्यात शासनास अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

हे पण वाचा ~  Guarented Pension : मोठी अपडेट ... सरकारी कर्मचारी जुनी पेन्शन योजना ऐवजी मुळ वेतनावर आधारित गॅरंटेड पेन्शन मिळणार ! NPS धारकांसाठी 35% ,40% , 50% पेन्शन?

जुनी पेन्शन अभ्यास समितीकडे प्राप्त झालेल्या माहितीचे सांख्यिकीय, आर्थिक, वैज्ञानिक, तांत्रिकदृष्टया विश्लेषण करुन शासनास परिपूर्ण शिफारस / अहवाल सादर करण्यासाठी समितीस दिनांक १४.०६.२०२३ पासून पुढील दोन महिन्यासाठी मुदतवाढ देण्यात येत आहे. 

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२३०७२७१५२९४२०१०५ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

This article written by Swati Ghuge form Maharashtra.She is famous Youtuber, website developer and Editor of MahEmployees.com

1 thought on “ops committee : जुन्या पेन्शन योजने संदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित! शासन निर्णय दिनांक 27/7/2023”

  1. Cm saheb Ani donihi deputy CM sahab Yana hi sandhi ahe tari tyani ops la ajun mudatvhad na karta aagami August madhe ops Bina sharth majur karavi mhanje pudhachya election la tyana aapaplya pakshyache changle result bhetatil Ani tyanach majority bhetel🙏 pan other wise tyani tolamtal Keli tar tyana bahumat bhetnar nahi, Jai Hind, Jai Maharashtra,🙏

    Reply

Leave a Comment