Close Visit Mhshetkari

PF Calculation : कर्मचाऱ्यांचे वय 25 वर्ष ,बेसिक सॅलरी 25 हजार रुपये; तर रिटायरमेंट फंड किती मिळणार? कॅलक्युलेशन समजून घ्या

PF Calculation : तुम्ही खाजगी कंपनीत काम करत असाल तर तुमचा पीएफ तुमच्या मासिक पगारातून कापला जात असेल. ही रक्कम तुमच्या EPF खात्यात जमा केली जाते, जी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) द्वारे मॅनेज केली जाते.

Provident Fund calculator

EPF ही खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या पगारदार कर्मचाऱ्यांसाठी एक कॉन्ट्रीब्‍युटरी रिटायरमेंट बेनिफिट योजना आहे. सरकार दर आर्थिक वर्षात पीएफवर व्याज जाहीर करते. आर्थिक वर्ष 2023 सालासाठी EPF व्याजदर 8.15 % आहे.

समजा एखाद्या कर्मचाऱ्यांचे सध्याचे वय वर्ष 25 असेल आणि कर्मचाऱ्याला सध्या दरमहा 25 हजार रुपये वार्षिक मासिक वेतन मिळत आहे. तर अशा कर्मचाऱ्याला आपल्या ईपीएफ खात्यात जमा रकमेवर किती पेन्शन मिळेल, फंड किती मिळणार ? या संदर्भात सविस्तर कॅल्क्युलेशन आपण बघणार आहोत.

EPF कॉन्ट्रीब्‍युशनचे नियम नेमके काय?

कर्मचाऱ्यांच्या मूळ पगाराच्या (+DA) 12 % रक्कम EPF खात्यात जमा केली जाते. परंतु, कर्मचारी वर्गणी ची 12 % रक्कम दोन भागांमध्ये जमा केली जाते. कर्मचारी वर्गणीच्या 12 % कॉन्ट्रीब्‍युशनपैकी 8.33 % रक्कम कर्मचारी पेन्शन योजना (EPS) मध्ये जमा केली जाते तर उर्वरित 3.67 % पैसे EPF खात्यात जमा होत असते.

हे पण वाचा ~  PF Calculation : वय 25 वर्ष आणि पगार सॅलरी 25 हजार रुपये; तर कर्मचाऱ्याला रिटायरमेंट फंड किती मिळणार? पहा कॅलक्युलेशन ...

जर पगार 25,000 रुपये असल्यास

पहिल्या वर्षी 25,000 रुपये बेसिक सॅलरी असलेल्या कर्मचाऱ्याच्या EPF खात्यात एकूण मंथली कॉन्ट्रीब्‍युशन 3917.5 रुपये ( 3000 + 917 रुपये ) असेल. यानंतर, वार्षिक आधारावर पगारात 5 % वाढ झाल्यामुळे, बेसिक आणि महागाई भत्ता त्याच प्रमाणात वाढून योगदान मध्ये वाढ होणार आहे.

EPF Calculation

  • मूळ वेतन + डीए = 25,000 ₹
  • सध्याचे वय = 25 वर्ष
  • सेवानिवृत्तीचे वय = 58 वर्ष
  • दरमहा वर्गणी = 12 %
  • कर्मचारी मासिक वर्गणी = 3.67 %
  • EPF वर व्याज दर = 8.15 टक्के प्रतिवर्ष
  • वार्षिक पगार वाढ = सरासरी 5 % (महागाई भत्तासह)
  • 58 वर्ष वयाचा मॅच्युरिटी फंड = 1.46 कोटी रुपये

ज्या कर्मचाऱ्यांची मूळ वेतन 15 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे, अशांनी या योजनेत सहभागी होणे अनिवार्य आहे. कारण पेन्शन खात्यात जास्तीत जास्त योगदान फक्त 15,000 रुपयांच्या मूळ वेतनावर केलं जाते.

Leave a Comment