Close Visit Mhshetkari

Employees Gratuity : ग्रॅच्युटी म्हणजे काय? कर्मचाऱ्यांना केव्हा,किती व कशी मिळते रक्कम? पहा सविस्तर

Employees Gratuity : ग्रॅच्युटी म्हणजे एखाद्या संस्थेतील कर्मचाऱ्यांने पाच किंवा अधिक वर्षांनंतर कंपनी सोडली, तेव्हा मिळवलेली बक्षीस म्हणून जी रक्कम मिळते ती म्हणजे ग्रॅच्युटी होय. सदरील रक्कम सामान्यपणे कामगाराला निवृत्त होताना मदत करते.

आरोग्य समस्यांमुळे त्यांच्या अकाली मृत्यू, अपंगत्व किंवा निवृत्तीची इच्छा असल्यास कामगारांना ही रक्कम दिली जाते.नुकतच सरकारी कर्मचाऱ्यांना जे एनपीएस धारक आहेत त्यांच्यासाठी ग्रॅच्युइटी आणि कुटुंब निवृत्ती वेतन योजना लागू केलेली आहे. 

ग्रॅज्युएटी म्हणजे काय ?

ग्रॅच्युएटी हा सरकारी कर्मचाऱ्याला मिळणारा पूर्व-परिभाषित फायदा आहे. जर कर्मचार्‍याने नोकरीच्या काही अटी पूर्ण केल्या तर त्याला विहित सूत्राद्वारे ग्रॅच्युएटी रक्कम दिली जाते.एखाद्या संस्थेत सतत 5 वर्षे काम केले तर कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युएटीचा लाभ मिळतो.बहुतांश वेळी निवृत्तीनंतर त्याची पूर्तता केली जाते, परंतु काही विशिष्ट परिस्थितीत आधीच रक्कम दिली जाते.

ग्रॅज्युएटी फायदा देणाऱ्या संस्था

पेमेंट ऑफ ग्रॅज्युएटी एक्‍ट, 1972 नुसार ज्याठिकाणी दहा पेक्षा अधिक कामगार काम करतात त्या प्रत्येक संस्थेमध्ये हा लाभ मिळवता येतो. जर कर्मचारी नोकरी बदलतो किंवा सोडून देतो, निवृत्त होतो अशा वेळेस त्याने ग्रॅज्युएटीचे नियम पूर्ण केले असतील तर त्याला ग्रॅज्युएटीचा लाभ मिळतो.

ग्रॅच्युइटी कधी मिळते?

पेमेंट ऑफ ग्रॅच्युइटी ॲक्ट 1972नुसार, एखाद्या कर्मचाऱ्याने चार वर्षं, 10 महिने आणि 11 दिवस सलग एकाच कंपनीत काम केले आणि त्यानंतर नोकरी सोडली,तर त्याला ग्रॅच्युइटी रक्कम देय होते.

हे पण वाचा ~  7th pay arrears : खुशखबर... सातवा वेतन आयोग फरक,ग्रॅच्युएटी,उपदान मिळणार! शासन निर्णय निर्गमित..

थोडक्यात एका कर्मचार्‍याच्या पगारातून ग्रॅच्युइटीचा एक छोटासा हिस्सा कापला जातो, पण मोठा भाग कंपनी स्वतःकडून देते. सध्याच्या नियमानुसार जर तुम्ही एका कंपनीत किमान ५ वर्षे काम केले तर तुम्हाला ग्रॅच्युइटीचा लाभ मिळतो. म्हणजेच पाच वर्षांनी कंपनी सोडल्यास तुम्हाला ग्रॅच्युइटी दिली जाईल.

ग्रॅच्युइटी पेमेंटसाठी पात्रता निकष

पेमेंट ऑफ ग्रॅज्युएटी एक्‍ट, 1972 कलम 4 (1) अंतर्गत, तुमच्या नियोक्त्याकडून ग्रॅच्युइटीचा दावा करण्यासाठी खालीलपैकी एक निकष पूर्ण करणे आवश्यक आहे:

  • ५ वर्षांच्या कामानंतर तुम्ही नोकरी सोडल्यास
  • सेवानिवृत्तीच्या बाबतीत
  • आजारपणामुळे किंवा अपघातामुळे तुम्हाला अपंगत्व आल्यास
  • कर्मचाऱ्याचे निधन झाल्यास
  • सुपरॅन्युएशन म्हणजे कर्मचार्‍याने ज्या वयात नोकरी सोडली असेल त्या वयाच्या करारात किंवा सेवेच्या अटींमध्ये निश्चित केलेले वय. 
  • एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या नॉमिनीला ग्रॅच्युइटी दिली जाते. 
  • जर कोणी नामनिर्देशित नसेल तर, उपदानाची रक्कम मृताच्या कायदेशीर वारसांना दिली जाईल.
ग्रॅच्युइटीवर आयकर भरावा लागतो का? 

भारताचा आयकर कायद्या नुसार ग्रॅच्युइटीला पगार मानल्या जातो आणि ‘पगारातून मिळकत’ अंतर्गत कर लावल्या जातो. एखाद्या कर्मचाऱ्याच्या नॉमिनीला त्याच्या मृत्यूमुळे ग्रॅच्युइटी दिली गेल्यास, ग्रॅच्युइटीची रक्कम ‘इतर स्त्रोतांकडून मिळणारे उत्पन्न’ अंतर्गत दिली जाते.किमान देय ग्रॅच्युइटी आयटी कायद्याच्या कलम 10 (10) अंतर्गत कर-शुल्क आहे. किमान खालील कर्मचार्‍याने प्राप्त केलेल्या करातून सूट आहे – 20 लाख रुपये

This article has been written by Raj Kakad from Maharashtra.He is a famous Marathi Blogger, Website Developer and Administrator of MahEmployees.com

Leave a Comment