Close Visit Mhshetkari

SBI bank : एसबीआय बँकेकडून ग्राहकांना मोठे गिफ्ट! पहा नवीन अपडेस

SBI News : नमस्कार आपले आमच्या वेबसाईट वर परत एकदा स्वागत आहे. देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या  स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहाकांसाठी मोठी सर्वात बातमी दिली आहे. यामुळे बँकेची कामेआता ग्राहकांना घरी बसल्या सहज करता येणार आहेत.SBI ने येनो अ‍ॅपमध्ये अनेक बदल केले आहे.

Yono sbi  द्वारे आता थेट स्कॅन आणि पेमेंट करता येणार आहे. बँकेने ने 2017 मध्ये हे अ‍ॅप सुरु केले होते. त्यानंतर त्याचे ग्राहक वाढतच गेले. बँकेच्या माहितीनुसार, आतापर्यंत करोडो लोक SBI चे अ‍ॅप वापरत आहे. या मुळे लोकांचे व्यवहार अगदी सोपे झाले

कार्डशिवाय सुद्धा पैसे काढता येतात

बँकेने आपल्या ग्राहकंनसाठी नवीन  सुविधा सुरू केली आहे. आपल्या ग्राहकांना कार्ड शिवाय पैसे काढण्याची पद्धत देखील बदलली आहे. आता SBI ग्राहक ICCW म्हणजेच इंटरऑपरेबल कार्डलेस कॅश काढण्याची सुविधा सुरू केली आहे.

या सुविधेनुसार, ग्राहक कोणत्याही एटीएममधून कार्डलेस कॅश काढू शकतात. यासाठी ते बँकेचे UPI QR कॅश फीचर वापरू शकतात. कार्डलेस कॅश वैशिष्ट्यामुळे लोकांचे कार्ड गमावण्याचा किंवा त्याचा गैरवापर होण्याचा धोका कमी होईल. याचा फायदाही करोडो लोकांना होणार आहे.

इंटरनेट किंवा मोबाईल बँकिंगद्वारे केलेल्या कोणत्याही IMPS व्यवहारावर ₹5 लाखांपर्यंत GST वर कोणतेही सेवा शुल्क आकारले जाणार नाही. एसबीआय ही मालमत्ता, ठेवी, शाखा, ग्राहक आणि कर्मचाऱ्यांच्या बाबतीत देशातील सर्वात मोठी बँक आहे. इंटरनेट बँकिंग आणि मोबाईल बँकिंग वापरणाऱ्या ग्राहकांची संख्या अनुक्रमे 94.4 दशलक्ष आणि सुमारे 21 दशलक्ष आहे.

हे पण वाचा ~  UPI payment : UPI द्वारे चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झालेत? टेन्शन घेऊ नका, या पद्धधतीनं मिळतील परत

SBI bank News updates

स्टेट बँक ही देशातील सर्वात मोठी बँक आहे .आपल्या ग्राहकांना उत्तम ऑनलाइन बँकिंग सुविधा देण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत.

SBI ने 2017 मध्ये YONO अॅप सुरू केले. त्यामुळे त्याचे ग्राहक मोठ्या     प्रमाणात वाढतच गेले.  आतापर्यंत बँकेच्या म्हणण्यानुसार,करोडो लोक SBI चे हे अॅप वापरत आहे. आता अॅपचा पेमेंट मोड बदलल्याने 60 दशलक्ष लोकांना  याचा फायदा होणार आहे. त्याच वेळी, बँकेने सांगितले की, गेल्या वर्षी सुमारे 78.60 लाख लोकांनी  अॅपद्वारे डिजिटल बचत खाती उघडली असून त्यात अनेक नवीन ग्राहक याचा फायदा घेत आहे.

YONO अॅपमध्ये  नवीन अनेक वैशिष्ट्ये

बँकेने म्हनण्याप्रमाणे, आता अॅपचे नाव ‘YONO for Every Indian’ असे करण्यात आले आहे. अशाप्रकारे अपडेट झाल्यानंतर हे अॅप हे सर्वांसाठी उपयुक्त असे अॅप  ठरले आहे. आता अॅपवर, कोणत्याही बँकेचे ग्राहक UPI ची सर्व वैशिष्ट्ये वापरू शकतात.

ज्यात स्कॅन आणि पे, कॉन्टॅक्टद्वारे पे, रिक्वेस्ट मनी यांचा समावेश करण्यात आला आहे. यासह, ग्राहक आता कोणत्याही थर्ड पार्टी अॅप्सवर न जाता एकाच ठिकाणाहून पैसे पाठवू आणि प्राप्त करू शकतात.

सदरील एपच्या मदतीने, SBI ग्राहक बँकिंग व्यवहारांव्यतिरिक्त चित्रपटाची तिकिटे बुक करू शकतात, शॉपिंग करू शकतात, खाण्या-पिण्याच्या बिलांसह इतर पेमेंट करू शकतात. आशा प्रकारे याचा व्यवहार करणे सोपे जाते.

Leave a Comment