ITR Filing : नमस्कार मित्रांनो आपल्याला माहिती असेल की सद्यस्थितीमध्ये आयटीआय म्हणजे प्राप्तिकर रिटर्न भरण्याची शेवटची तारीख जवळ आलेली आहे.आयटीआर फॉर्ममध्ये प्राप्तिकर रिटर्न (ITR) फाईल करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2024 रोजी आहे.
आपण जर सध्यापर्यंत आयटीआय भरलेला नसेल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती आपण घेऊन आलो आहोत. ITR Folling मध्ये अनेक महत्वाचे बदल झाले आहेत.ज्याचा आपल्याला आयटीआय भरताना नक्कीच फायदा होणार आहे.
Income Tax Return Filing
मूल्यांकन वर्ष 2024-25 साठी आयकर रिटर्न दाखल करावे लागणार आहे.आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये तुमचे उत्पन्न, खर्च आणि गुंतवणूक यांचा हिशोब आपल्याला सादर करावा लागणार आहे.
आपण जर आयटीआय भरत असाल आणि ITR Form मध्ये झालेला बदल आपल्याला माहिती नसेल तर मित्रांनो हा लेख आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरू शकतो नवीन आयटीआय फाईल मध्ये यावर्षी आयकर विभागाने अतिरिक्त माहिती मागवलेली आहे.
1.राजकीय पक्षांना निधी देणाऱ्या करदात्यांना आयकर कायद्याच्या कलम 80GGC अंतर्गत 100 % कर सवलत मिळणार आहे.
2. करदात्याने जर कलम 80DD अंतर्गत डिडक्शन क्लेम केला असेल तर त्याला डिसेबल्ड डिपेंडेंट्सची माहिती द्यावी लागेल.पॅन आणि आधार कार्ड सोबत जोडावे लागेल.
3. शेअर मार्केटमध्ये उलाढाल करणाऱ्या करदात्यांकडून सेस आणि इतर टर्नओव्हरची माहिती मागविण्यात आली आहे. इंट्राडे म्हणजेच एकाच दिवशी खरेदी अथवा विक्री केली असेल तर ही माहिती द्यावी लागणार आहे.
4. मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जीवन विमा पॉलिसीमध्ये वार्षिक बोनस मिळाल्यानंतर आयटीआर -2 आणि आयटीआर-3 मध्ये याविषयीची माहिती स्वतंत्र द्यावी लागणार आहे.
5.करदात्यांना त्यांच्या एम्प्लॉई स्टॉक ऑप्शंस (ई-सॉप्स), इतर व्हर्च्युअल अॅसेटची वा ऑनलाईन गेमिंगद्वारे जिंकलेल्या रक्कमेची माहिती द्यावी सुद्धा आता द्यावी लागणार आहे.
I like this web site very much, Its a real nice spot to read and get information.Blog money